जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप महिला मोर्चाचे पोलिसांना निवेदन

देवरी◼️ भाजप महिला मोर्चाचे अध्यक्ष चित्रा वाघ यांची मानहानी आणि बदनामी केल्याप्रकरणी पोलिसांना निवेदन आणि तक्रार करण्यात आली आहे. यातक्रारी मधे भाजप महिला मोर्चाच्या प्रतिनीधी समाजात महिला सबलीकरण करण्याचे तसेच सामाजिक आर्थिक स्तरावर महिलांना सक्षम करण्याचे काम करतोय जिथे जिथे महिलांवर अन्याय होतो तिथे आम्ही आवाज उठवतो. पण सध्या आमच्या प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रकार राष्ट्रवादीचे मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड करत आहेत. हे पाहता एक महिला म्हणून आम्ही शांत बसू शकत नाही. असे म्हंटले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी 9 जून रोजी रात्री १२ वाजून ५३ मिनिटांनी चित्रा वाघ यांच्या संदर्भात बदनामकारक मजकूर ट्विटवर अपलोड केला आहे. चित्रा वाघ यांची मानहानी करण्याचा, त्यांना बदनाम करण्याचा, त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचा आणि सामाजिक जीवनातून उठविण्याचा प्रकार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

जिजाऊ, सावित्री बाई फुले यांच्या महाराष्ट्रात महिलांच्या चारित्र्यावर शितोंडे उडवले जात आहेत, हे सहन केले जाणार नाही. म्हणून महिला नेत्या चित्रा वाघ यांची ट्विटरवरून बदनामी, मानहानी केल्याप्रकरणी आणि बदनामकारक मजकूर ट्विटरवर टाकल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी विनंती सदर निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी सविता पुराम, अंबिका बंजार , देवकी मरई , गोमती तितराम, माया निर्वाण, नूतन कोवे, तनुजा भेलावे, पिंकी कटकवार, कल्पना वालोदे ,वैशाली पंधरे, कौशल्या कुंभरें, अंजू बिसेन आदि उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share