पाणी टंचाई कार्यक्रमांतर्गत दुरुस्तीच्या 130 कामांना प्रशासकीय मंजुरी
गोंदिया ◼️पाणी टंचाई कार्यक्रम टप्पा दोन अंतर्गत गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, सडक अर्जुनी, सालेकसा, आमगाव व देवरी तालुक्यातील सार्वजनिक विहीरीतील गाळ काढणे, सार्वजनिक विहीरीचे खोलीकरण, इनवेल बोर, नळ योजना विशेष दुरुस्तीच्या 130 कामांना जिल्हाधिकारी चिन्मय गोतमरे यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामांवर 1 कोटी 58 लाख 61 हजार 302 रुपये खर्च होणार आहेत.
गोंदिया तालुक्यातील 2 गावे, तिरोडा 3, गोरेगाव 7, सडक अर्जुनी 73, सालेकसा 36, आमगाव 7 व देवरी तालुक्यातील 2 गावांचा यात समावेश असून इनवेल बोर करणे, नळ योजना विशेष दुरुस्ती, विहीर खोलीकरण इत्यादी उपाय योजनांच्या कामाचे अंदाजपत्रक जिपच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांच्या शिफारशीसह पाणी टंचाई कार्यक्रम 2022-23 टप्पा-2 अंतर्गत सार्वजनिक विहीरीतील गाळ काढणे, सार्वजनिक विहीरीचे खोलीकरण, इनवेल बोर, नळ योजना विशेष दुरुस्ती असे एकूण 130 कामांचे अंदाजपत्रक जिल्हाधिकारी यांना सादर केले होते. यातंर्गत गोंदिया तालुक्यातील 2 कामांसाठी 10 लाख 30 हजार 87 रुपये, तिरोडा तालुक्यातील 3 कामांसाठी 19 लाख 13 हजार 626 रुपये, गोरेगाव तालुक्यातील 7 कामांसाठी 5 लाख 45 हजार 655 रुपये, सडक अर्जुनी तालुक्यातील 73 कामांसाठी 89 लाख 95 हजार रुपये, सालेकसा तालुकयातील 36 कामांसाठी 24 लाख 64 हजार 482 रुपये, आमगाव तालुक्यातील 7 कामांसाठी 8 लाख 31 हजार 942 रुपये व देवरी तालुक्यातील 2 कामांसाठी 80 हजार 510 रुपयांचे अंदाजपत्रक कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा, जिल्हा परिषद गोंदिया यांनी सादर केले होते. या कामांना जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.
तसेच गोंदिया तालुक्यातील फत्तेपुर, दांडेगाव. तिरोडा तालुक्यातील आलेझरी, बयवाडा, मनोना. गोरेगाव तालुक्यातील मोहगाव बु., बाजारटोला (चोपा), मलपुरी, सर्वाटोला मोहगाव, हिरडामाली, गणखैरा, मोहाडी. सडक अर्जुनी तालुक्यातील सावंगी, कनेरी राम, राका, खोबा, फुटाळा, कोसबी, कोहमारा, घाटबोरी को., सितेपार, कोसमतोंडी, चिचटोला, मुरपार ले., गोंगले, खोडशिवनी, घाटबोरी/ते., बौध्दनगर, धानोरा, मुंडीपार ई., पांढरी, खाडीपार, तिडका, गिरोला, हेटी, खजरी, डव्वा, म्हसवाणी, गोपोलटोली, पळसगाव, पाटेकुर्रा, दोडके जांभळी, डोंगरगाव ख., वडेगाव, राजगुढा, घोटी, पांढरवाणी रै., शेंडा, बाम्हणी ख., खडकी, डुग्गीपार, चिरचाडी, कन्हारपायली, रेंगेपार द., उशीखेडा, बोपाबोडी, रेंगेपार पा., सौंदड, पळसगाव रा., बाम्हणी स., कोकणाज., चिखली. सालेकसा तालुक्यातील गिरोला, गांधीटोला, धानोली, दर्रेकसा, दरबडा, बोदलबोडी, बिंझली, बिजेपार, बाम्हणी, झालिया, टोयागोंदी, तिरखेडी, सातगाव, रोंढा, पोवारीटोला, पिपरिया, पाथरी, पाऊलदौना, पांढरवाणी, मुंडीपार, मानागढ, मक्काटोला, खोलगढ, लोहारा, खेडेपार, कुलरभट्टी, कोटरा, कोटजंभोरा, कढोतीटोला, कहाली, जमाकुडो, गोर्रे, लटोरी, नवेगाव, ठाणा. देवरी तालुक्यातील फुक्कीमेटा. आमगाव तालुक्यातील महारीटोला, अंजोरा, फुक्कीमेटा, सुरकुडा, ठाणा, वाघडोंगरी/पाऊलदौना, पाऊलदौना या गावातील कामे प्रस्तावित आहेत. उपविभागीय अधिकारी, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, गोंदिया व तहसिलदार यांनी या कामावर नियंत्रण व देखरेख ठेवणार आहेत.