लोकसभा निवडणूक प्रमुखपदी विजय शिवणकर

गोंदिया ◼️ भारतीय जनता पक्षाच्यावतीने महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात येत्या 2024 च्या निवडणुकीची तयारीच्या दृष्टीने लोकसभा निवडणूक प्रमुखांची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यानी केली आहे. यामध्ये गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नागपूर लोकसभा निवडणूक प्रमूखपदावर प्रविण दटके व गडचिरोली-चिमूर लोकसभा निवडणूक प्रमुख पदावर किसन नागदेवे यांची निवड करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी शनिवारी एक बैठक पार पडली. या बैठकीत खासदार आणि आमदारांचा देखील समावेश होता. शिंदे गट शिवसेना आणि भाजपचे उमेदवार निवडून यावे म्हणून या निवडणूक प्रमुखांकडे त्या त्या मतदारसंघानुसार जबाबदारी देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील गोंदिया विधानसभा निवडणूक प्रमुखपदी माजी आमदार हेमंत पटले, तिरोडा-गोरेगाव विधानसभा निवडणूक प्रमुखपदी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष डॉ.वसंत भगत, अर्जुनी मोरगाव विधानसभा निवडणूक प्रमुख पदावर माजीमंत्री इंजि.राजकुमार बडोले, आमगाव विधानसभा माजी आमदार संजय पुराम, साकोली विधानसभा प्रमुख माजी मंत्री परीणय फुके, तुमसर विधानसभा निवडणूक प्रमूखपदी प्रदिप पडोळे यांची निवड करण्यात आली आहे.

Share