देवरी 🚨टायगर मॉनिटरींगचा कैमरा चोरी, NNTR चे वन्यजीव आणि वनसंपदा धोक्यात ?

देवरी ◼️ गोंदिया जिल्हाला निसर्गाने भरभरून नैसर्गिक सौंदर्य दिलेले आहे त्यासोबतच (NNTR )नागझिरा नवेगावबांध टाइगर रिझर्व प्रोजेक्टमुळे वन्यप्राणी आणि वनसंपदा जिल्हाचा आकर्षणाचा केंद्र ठरलेला आहे. नुकतेच राज्याचे वनमंत्री तथा गोंदिया जिल्हाचे पालकमंत्री सुधीर मुनघंटीवार यांच्या उपस्थित टी १ वाघीण सोडण्यात आली. सोडलेली वाघीण जिल्हात भटकत असल्याचे वृत्त ताजे असतांना वनविभागाने टायगर मॉनिटरींगसाठी लावलेला सी १ कडी बैंक प्रोफेशनल कलर टॅप कॅमेरा चोरीला गेल्याची घटना घडली असून देवरी पोलिसांमध्ये चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टायगर मॉनिटरींगसाठी लावलेला सी १ कडी बैंक प्रोफेशनल कलर टॅप कॅमेरा चोरीला गेला असल्यामुळे त्या कॅमेरामध्ये काय ट्रैप झाले होते असा प्रश्न वन्यप्रेमींना पडला आहे. कैमरा चोरीला गेल्यामुळे त्या परिसरात शिकार झाली का ? जिल्हात सक्रिय असलेल्या गैंग ने लाकूड चोरी केली का ? पुरावे मिटविण्यासाठी कैमरा चोरी गेला का ? असे अनेक प्रश्न निरुत्तरित आहेत.

टायगर मॉनिटरींगसाठी लावलेला सी १ कडी बैंक प्रोफेशनल कलर टॅप कॅमेरा चोरी मुळे वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. यावर्षी जिल्हात काळ्या बिबट्याचा शिकार प्रकरणी सक्रिय गँग ला अटक करण्यात आली हे विशेष.

सुत्राच्या माहितीनुसार देवरी तालुक्यात लक्झरी गाड्यामधून लाकूड तस्करी होत असल्याचे चर्चा सुरू असतांना वनविभागाचा चोरी गेलेला कैमरा वनविभागाला संशयाच्या चौखटीत उभा करत आहे.

चोरी गेलेला कैमरा दिनांक ०६/०६/२०२३ चे ७:३० वा . दरम्यान फिर्यादी दिपक चोपराम बरडे, वय ३६ वर्ष, रा. खडकी, ता. सडक / अर्जुनी, (बिट रक्षक खडकी भाग – २ सहवनक्षेत्र खडकी वनपरिक्षेत्र कार्यालय डोंगरगाव वन्यजीव स्थीत कोहमारा) हे त्याचे अधिनस्त वनपरिक्षेत्रातील ढोलीगोटा नाला जंगल परिसर येथे गस्त करित असता टायगर मॉनिटरींगसाठी लावलेला सी १ कडी बैंक प्रोफेशनल कलर टॅप कॅमेरा बिलाप्रमाणे त्याची कि १२,२८६ / रू चा दिसुन आला नाही सदर कॅमरेचा याचा शोध घेतला परंतु मिळुन न आल्याने कोणीतरी अज्ञात चोराने कॅमेरा चोरून नेल्याने फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पोस्टे देवरी येथे अप. क १८९ / ०२३ कलम ३७९ भादवि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन तपास पोहवा / १२६० देसाई, पोस्टे देवरी हे करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share