क्रांतीसुर्य विर बिरसा मुंडा बलीदान दिवसानिमित्त आरोग्य शिबीर मेळावा

Deori ◼️कम्युनिटी पोलीस सिंगच्या माध्यमाने दादा लोरा खिडकी योजनेअंतर्गत पोलीस ठाणे देवरी देवरी तालुका आरोग्य विभाग यांच्या सुयुक्त विदयामाने सौजन्यान क्रांतीसुर्य विर बिरसा मुंडा बलीदान दिवस निमित्त आरोग्य शिबीर मेळावा टोयागोंदी येथे मेळाव्याचे आयोजन केले होते. पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांच्या संकल्पनेतुन अपर पोलीस अधिक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन दादालोरा खिडकी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करता यावी या करिता गोंदिया जिल्हा पोलीस दल यांचे सौजन्याने दिनांक ०९ / ६ / २०२३ रोजी पोलीस ठाणे देवरी, देवरी तालुका आरोग्य विभाग यांच्या सयुक्त विदयामाने आरोग्य शिबीर मेळावा पोलीस स्टेशन देवरी अंतर्गत मौजा टोयागोंदी येथे आयोजीत करण्यात आला होता. सदर आरोग्य शिबीरला पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण डांगे व डॉ. बिसेन प्राथमिक आरोग्य केंद्र भरेंगांव त्यांची चमू यांनी भेट देवुन मार्गदर्शन केले. आयोजित मेळाव्याला अतिदुर्गम आदिवासी नक्षल प्रभावित भागातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आरोग्य शिबीर मध्ये १९० ते २०० नागरिक सहभाग घेतले होते. सदर आरोग्य शिबीरमध्ये १४० ते १५० नागरिक यांची बी.पी. सुगर व इत्यादी रोगावर उपचार करण्यात आले.

Print Friendly, PDF & Email
Share