अधिकारी घरी येतील; सरकारी योजनांचा लाभ देतील !

◼️दिव्यांगांच्या दारी शासनाचे सर्व प्रमाणपत्रे एकाच ठिकाणी मिळणार

गोंदिया ■ दिव्यांगांसाठीराबविण्यात येणाऱ्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात ‘दिव्यांगांच्या दारी शासन’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यातही जून किंवा जुलै महिन्यात हे अभियान राबविले जाणार असून, दिव्यांग व्यक्तींपर्यंत शासन पोहोचणार असून, यूडीआयडी कार्ड घरपोच आहे. मिळण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत जिल्हास्तरावर दिव्यांगांच्या दारी शिबिराचे आयोजन करण्यात येणार या शिबिरात शासनाचे सर्व विभाग, सर्व शासकीय यंत्रणा, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या अशासकीय संस्था एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगांच्या तक्रारी जाणून घेणार आहेत. दिव्यांगांच्या दारी शासन या अभियानांतर्गत विशेष कॅम्प घेण्यात येणार आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share