लास्टिक बंदी साठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे तहसीलदारांना निवेदन

आमगाव ◼️शासनाने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालती असून या निर्णयाची अंमलबजावणी करुन तालुक्यातील प्लास्टिक बंदी करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आमगाव शाखेच्या वतीने तहसीलदारांना निवेदनातून करण्यात आली.प्लास्टिकमुळे पर्यावरण व पर्यायाने मानवी आरोग्याला होणारा धोका लक्षात घेता शासनाने ठराविक जाडीशिवाय प्लास्टिक पिशव्या वापरावर बंदी घालती आहे.

मात्र तालुक्यात कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरु आहे. व्यावसायीक व नागरिकांनी फेकलेल्या प्लास्टिक पिशव्या नाले व रस्त्याशेजारी साचत असून त्यामुळे पर्यावरणासह जनावरे व नागरिकांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यात प्लास्टिक बंदी करण्यात यावी, अशी मागणी अभाविपच्या तालुका शाखेने जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त निवेदनातून तहसीलदार रमेश कुंभरे यांना केली. तसेच प्लास्टिक बंदी घालण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान शहरातील विविध मार्गावरील प्लास्टिक पिशव्या गोळा करुन जनजागृती करण्यात आली. निवेदन देताना प्रफुल्ल सोमवंशी, आशिस बोहरे, चेतन लांजेवार, अविनाश बिसेन, ठानेंद्र कुशराम, विश्वजीत ठाकरे, रुपेश भगत उपस्थित होते.

Share