ब्लॉसम स्कूलची इशिता उंदीरवाडे (96.40 %) आणि संस्कृती लांजेवार (95.80%) SSC परीक्षेत देवरी तालुक्यात अव्वल

◼️देवरी तालुक्यातील ब्लॉसम पब्लिक स्कूलचे 5 विद्यार्थी प्रावीण्य सूचीत

देवरी 02- येथील लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी SSC परीक्षा -2023 ( इंग्रजी माध्यम) परीक्षेत उत्तुंग भरारी मारली असून घवघवीत यश संपादन करीत तालुक्यात अव्वल येण्याचा मान मिळविला आहे. परीक्षेत बसलेले सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल दरवर्षी प्रमाणे 100 टक्के लागला आहे. 

यामध्ये कु. इशिता उंदीरवाडे हिने (482/500) 96.40 टक्के गुण प्राप्त करून तालुक्यातून प्रथम क्रमांक , कु. संस्कृती लांजेवार हिने 95.80 टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावला आहे या सोबतच संचिता शेंद्रे – 94.20% , इशिका काळे -90.40%, साक्षी मेश्राम- 90 % प्रावीण्य सुचित असून लॉसम पब्लिक स्कूल चे नाव लौकिक केले.

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. सुजित टेटे, वर्गशिक्षक नामदेव अंबादे , नितेश लाडे , वैशाली मोहुर्ले , सरिता थोटे , गुंजन जैन तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. याचप्रमाणे कल्पवृक्ष शिक्षण संस्थेचे सचिव निर्मल अग्रवाल , अध्यक्षा अंकिता अग्रवाल तसेच व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Print Friendly, PDF & Email
Share