पोलिस पाटील संघटनेचे माजीमंत्री फुके यांना निवेदन
आमगाव◼️ जिल्हा महाराष्ट्र गाव कामगार पोलिस पाटील संघटनेतर्फे माजी पालकमंत्री परिणय फुके यांना पोलिस पाटलांच्या विविध मागण्या चे निवेदन देण्यात आले. निवेदना, वेळोवेळी कायद्यांमध्ये बदल होत असल्यामुळे कार्यशाळा घेऊन पोलिस पाटलांना दरवर्षी प्रशिक्षण देण्यात यावे, पोलिस पाटलांचे मानधन वाढवून 20 हजार रुपये करण्यात यावे, पोलिस पाटलांची रिक्त पदे त्वरित भरण्यात यावे,
वारस दाखला देण्याबाबत व अन्य दाखले देण्याबाबत खुलासा करण्यात यावा, निवडणुकीच्या वेळी पोलिस पाटलांना मतदान केंद्रावर उपस्थित राहण्याबाबत आदेश देण्यात यावे, व त्यांचा निवडणूक भत्ता देण्यात यावा, पोलिस पाटलांची सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षाऐवजी 65 वर्ष करण्यात यावे, पोलिस पाटलांना सेवानिवृत्तीनंतर वृद्धापकाळ जगण्यासाठी सेवानिवृत्तीनंतर सरसकट एक मस्त 10 लाख रुपये देण्यात यावे, अटल पेंशन योजना सर्व वयातील पोलिस पाटलांना सरसकट सर्वांना लागू करण्यात यावे, ग्राम पोलीस अधिनियम 1967 मध्ये दुरुस्ती करण्यात यावी, जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा पोलिस पाटील भवन निर्माण करण्यात यावे, ज्या पोलिस पाटलांना दोन-तीन किंवा जास्त गावांच्या अतिरिक्त कारभार देण्यात येतो त्याबाबत मोबदला देण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष प्रवीणकुमार कोचे, रामनगर पोलिस स्टेशनचे अध्यक्ष उमेशकुमार बावनकर, जिल्हा संघटक सुभाष अंबादे, जिल्हा उपाध्यक्ष नर्मदा चुटे, जिल्हा कोषाध्यक्ष मनोज बडोले, सालेकसाचे तालुका अध्यक्ष लालचंद मच्छीये, तिरोडाचे प्रकाश मेश्राम, आमगावचे तालुकाध्यक्ष सुरेश कोरे, चिचगडचे अध्यक्ष तीर्थराज पटले, चंद्रसेन रहांगडाले, राजेंद्र पटले, संतोष बहेकार, प्रतिभा कोरोंडे, संगीता भोयर, गिरधारी राहिले, हेमेश्वरी चौधरी, विजय कापसे तसेच जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी व सदस्य पोलीस पाटील उपस्थित होते.