देवरी 🚨सरपंचाला भर ग्रामसभेत चक्क माईक वर शिव्या दिल्या, पोलिसात गुन्हा दाखल

देवरी ◼️ ग्रामपंचायत शेंडा येथे विविध विषयावर चर्चा सुरू असतांना चक्क माईक पकडून एकाने भर ग्रामसभेत शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर असे की दि. २९/०५/२०२३ ला फिर्यादी व आरोपी हे ऐकाच गावचे राहणारे असुन वेगवेगळया ठिकाणी राहतात मौजा शेंडा येथील फिर्यादी व आरोपी हे गावच्या ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये गावातील मुददेसुद चर्चा करित असताना यातील आरोपीनी ग्रामसेवक यांचे जवळुन जबरदस्तीने माईक हिसकावुन घेवुन नवीन पानी टाकी चे बांधकाम तसेच बहुउदेशीय ईमारत बांधकाम हे मी कधीही होवु देणार नाही असे बोलून सरपंच यांना माईकवर शिवीगाळ केल्याने आरोपी विरूध्द कार्यवाही होणेकरिता फिर्यादी श्रीमती ग्यारशी विजय रामरामे, वय ५० वर्ष, यांचे तोंडी रिपोर्ट वरुन सदरचा गुन्हा पोस्टे देवरी येथे अप क.१६६ / २०२३ कलम ३५३, २९४, १८६, ५०४, ३४ भा.द.वि अन्वये सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला असुन गुन्हाचा तपास सपोनी खोपीकर पोस्टे देवरी हे करित आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share