शिळे अन्न देण्याच्या कारणावरून भांडण, शेजाऱ्यास जखमी केले, पोलिसात गुन्हा दाखल

देवरी ◼️ शिळे अन्न देण्याच्या कारणावरून जखमी एकास जखमी केले असून देवरी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दि. २६/०५/२०२३ १८/०० वा ते १९/३० वा दरम्यान फिर्यादी लक्ष्मण कोटु नागरीकर, वय ३६ वर्ष, रा. भागी ता. देवरी जि. गोंदिया हा आपले घरी असताना फिर्यादीने आपल्या आईला नामे एकादशी नागरीकर हीला तु मला आमलेला भात ठेवलीस असे बोलला असता त्यावरुन त्याचे दोघामध्ये तोंडातोंडी भांडन झाले. त्यावेळी घराशेजारी राहणारा आरोपी हा त्या ठिकानी आला व फिर्यादी यास तु आपले आई सोबत कशाला झगडा भांडण करतोस असे बोलून तोंडातोडी भांडण करुन शिवीगाळ केले. त्यावर फिर्यादी यांनी माझे सोबत कशाला शिवीगाळ करुन झगडा भांडण करतोस असे बोलला असता आरोपी हा फिर्यादी चे अंगावर धावुन आल्याने आरोपी व फिर्यादी यांनी एकमेकास ढकलढकलु केले त्यावेळी आरोपी यांनी त्याचे घरी अंगणातील बासाची काठी घेवून आला व फिर्यादीच्या डोक्यावर मारुन जखमी केले त्यामुळे फिर्यादी यास जखम होवुन रक्त निघाल्याने फिर्यादीचे लेखी रिपोर्ट पो.स्टे. देवरी येथे १६४ / २०२३ कलम ३२४, ५०४, भादवी अन्वये गुन्हा नोद करण्यात आला तपास पोहवा गायधने / ८७८ पो.स्टे. देवरी हे करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share