अनुदानित आश्रमशाळांतील कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लागल्या, विभागीय संस्कृती संघटनेचे मोठे यश !

नागपूर◼️ विभागिय संस्कृती संघटना नागपूरची सभा अपर आयुक्त कार्यालय नागपूर येथे पार पडली. नवनिर्वाचीत शिक्षक आमदार सुधाकर अडवाले हे समेचे अध्यक्ष होते. यात नागपूरचे अपर आयुक्त ठाकरे साहेब, संस्कृती संघटनेचे अध्यक्ष भोजराज फुंडे , सिटू संघटनेचे सचिव भामरे , उपायुक्त कुळमेथे , जोशी साहेब आणि सर्व प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा पार पडली.

सभेची सुरुवात अपर आयुक्त मा. ठाकरे साहेबांच्या प्रस्तावनेने झाली. यात प्रामुख्याने नो वर्क नो पे आणि अतिरीक्त कर्मचा-यांचे समायोजन या मुद्द्यांनी सभेची सुरुवातच गाजली. शासन निर्णयानुसार कोणताही कर्मचारी समायोजनापासून वंचीत राहणार नाही. आणि खंडीत सेवाकालावधी क्षमापित करुन तात्काळ निकाली काढण्याचे आदेश मा. अपर आयुक्तांनी सर्व प्रकल्प अधिका-यांना दिले.

यानंतर नियमित वेतनवाढ, वैद्यकिय बिले, आश्रमशाळांची वेळ, डिसिपीएस व जिपीएफ पावत्या हिशोब, पहारेकरी कोर्टाचा आदेश व सेवासातत्य, सातव्या वेतन आयोगाचे बाकी हप्ते अतिरीक्त घरभाडे, प्रयोग शाळा परिचरांची पदोन्नती, सेवा निवृत्त कर्मचारी अनुषांगिक लाभ, अनुकंपा तत्वावरील भरती, नियमित वेतन, चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांची सार्वजनिक सुट्टयांची बदली रजा, कर्मचा-यांचे प्राणकार्ड, जुनी पेंन्सन विकल्प इत्यादी आजपर्यंत न सुटलेल्या समस्यांचे आरोप संस्कृती संघटनेचे अध्यक्ष श्री. भोजराज फुंडे यांनी भर सभेत केल्यामुळे या सर्व समस्यांसाठी मा. आमदार सुधाकर अडबाले साहेबांनी अपर आयुक्त कार्यालय नागपूर यांना धारेवर धरले.

त्यामुळे अपर आयुक्त मा. ठाकरे साहेबांनी, अपर आयुक्तांच्या अखत्यारित असलेल्या सर्व समस्या 30 जुन 2023 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत सोडविण्याचे आस्वासन यावेळी संघटनेला दिले. आणि तशा सुचना सर्व प्रकल्प अधिका-यांना देउन, तसे पत्र काढण्याच्या सुचना शुद्धा दिल्या. त्यानुसार सर्व प्रकल्प अधिका-यांनी तात्काळ कारवाई सुद्धा सुरु केली आहे. यावेळी जुलै 2023 च्या पहिल्या आठवडयात या संदर्भात पुन्हा आढावा बैठक आयोजित करण्याच्या स्पष्ट सुचना, मा. आमदार साहेबांनी अपर आयुक्तांना दिल्या.

सभास्थळी विभागिय संस्कृती संघटनेचे सचिव प्रकाश उघाडे, सहसचिव विकास जनबंधू, संघटक परमानंद पुजारीप्रसिद्धी प्रमुख जन्मेजय खुणे, विजय चिरवतकर, अजय जाधव, रविशंकर झिंगरे, श्रिकांत भोयर इत्यादी संघटनेचे पदाधिकारी आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share