गोंदिया जिल्हाच्या मुख्यमंत्री सचिवालय कक्षात 4 महिन्यात 93 तक्रारी

◼️सर्वाधिक तक्रारी जिल्हा परिषद गोंदिया येथील विभागांच्या

गोंदिया : सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीचे लवकरात लवकर निवारण व्हावे, या उद्देशाने शासनस्तरावरून जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू करण्यात आला. गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात उभारण्यात आलेल्या मु‘यमंत्री सचिवालय कक्षात जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत 93 तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी बहुतांश तक्रारी या जिल्हा परिषदेच्या विविध विभागांशी संबंधित असल्याची माहिती आहे.

सामान्य नागरिकांना अनेक समस्या भेडसावतात. एवढेच नाही तर सरकारी कर्मचार्‍यांच्याही अनेक समस्या असतात. समस्या सोडविण्यासाठी तक‘ारदार संबंधित विभागाकडे तक‘ारी करून त्यांचे निराकरण करण्याच्या अपेक्षेत असतात. मात्र वेळेत समस्या सोडवली जात नसल्याने तक‘ारदारांना आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास होतो. याची गांभीर्याने दखल घेत, तक‘ारदारांच्या तक‘ारींचे लवकरात लवकर निवारण करण्यासाठी शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयात मु‘यमंत्री सचिवालय कक्ष सुरू केला आहे. या कक्षात सर्वसामान्य नागरिकांपासून ते सरकारी कर्मचार्‍यांपर्यंतच्या तक‘ारींचे निवारणही करता येणार आहे. गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात जानेवारी 2023 मध्ये मु‘यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आला.

या कक्षात येणार्‍या तक‘ारी थेट मु‘यमंत्री सचिवालयाशी जोडल्या जातात, त्यामुळे समस्या निकाली निघण्यास फारसा वेळ लागत नाही. या संदर्भात आतापर्यंत 93 तक‘ारींची नोंद झाल्याची माहिती मु‘यमंत्री सचिवालय कक्ष विभागाकडून देण्यात आली. त्यापैकी 23 तक‘ारी मु‘यमंत्री कार्यालय स्तरावरील असून त्या निकाली काढण्यासाठी मु‘यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्यात आल्या आहेत. एक तक‘ार चंद्रपूर जिल्ह्यातील असून, याप्रकरणी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाकडे तक‘ार पाठविण्यात आली आहे. उर्वरित 68 तक‘ारींचे निवारण करण्याची प्रकि‘या सुरू असून संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना सादर करण्यात आल्या आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share