देवरी🚨 फ्रिजमधे पाण्याच्या बॉटल भरून ठेवत नाही या कारणावरुण जखमी केले, पोलिसात गुन्हा दाखल

देवरी ◼️ तालुक्यातील भरेगाव येथे फ्रिजमधे पाण्याच्या बॉटल भरून ठेवत नाही या कारणावरुण मारहाण आणि जखमी केल्याची घटना घडली असून सदर गुन्हा देवरी पोलिसात दाखल करण्यात आला आहे. सविस्तर असे की दिनांक १६/०५/२०२३ चे २३/०० वा. ते २३/३० वा दरम्यान फिर्यादी दुलीराम सोमाजी दोनोडे, वय ५८ वर्ष, रा. भर्रेगाव ता. देवरी व त्याची पत्नी जेवन करून घराच्या समोरील अगंणात आपआपल्या खाटेवर आराम करत असतांना आरोपी हा दारूपाणी पिडुन आला व फिर्यादीच्या पत्नीला म्हणाला की तु फ्रिजमध्ये पाण्याच्या बॉटल भरून ठेवत नाही या कारणाला धरून फिर्यादीच्या पत्नीला शिवीगाळ करत होता यावेळी फिर्यादी दुलीराम सोमाजी दोनोडे आरोपीला बोलले की एवढया रात्री दारू पिडुन घरी आलास व आपल्या आईला त्रास कशाला देतोस असे म्हटले असता आरोपीने तु मधात कशाला बोलतोस म्हणुन फिर्यादीसोबत तोंडातोंडी भांडण करून शिवीगाळ केली व हातात विटेचा तुकडा घेऊन फिर्यादीच्या डोक्याला मागील बाजुस मारले त्यामुळे डोक्याच्या मागील बाजुस जखम होडुन रक्त निघाले. नंतर पुन्हा जवळ येडुन फिर्यादीच्या गालाच्या उजव्या बाजुला दाताने चावा घेतला व तु जर मधात बोललास तर तुला जिवाने मारून टाकीन अशी धमकी दिल्याने फिर्यादीचे रिपोर्टवरून व डॉक्टरी अभिप्रायावरून पोस्टे देवरी येथे अप क्र. १५२ / २०२३ कलम ३२४, ५०४, ५०६ भादवी अन्वये नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हाचा तपास पोना / १९०६ पंधरे पोस्टे देवरी हे करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share