वन विभागाची मोठी कारवाई, अवैध गट्टू कारखान्यावर धाड टाकून करोडो रुपयाची सामुग्री जप्त
सडक अर्जुनी: तालुक्यातील ससीकरण देवस्थान परिसरात राखीव वन गट नंबर 165 कंपार्टमेंट नंबर 554 मध्ये 255 चौरस मीटर क्षेत्रात अग्रवाल ग्लोबल इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड रायपूर या महामार्ग बांधकाम करणाऱ्या कंपनीने वन विभागाची कुठलीही परवानगी न घेता गट्टू बनविण्याचा कारखाना उभारला त्यात लागणारी यंत्रसामग्री तसेच गट्टू तयार करण्याकरिता लागणारा कच्चा मटेरियल व मजुरांना राहण्याकरिता टिनाचे शेड उभे केले. काही दिवसापासून हा कारखाना अवैधरित्या सुरू असताना 16 मे 2023 ला सकाळी सात वाजता गुप्त माहिती द्वारे सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्राधिकारी सुरेश जाधव यांनी त्या अवैध कारखान्यावर आपल्या सहकाऱ्यांसोबत धाड टाकून करोडो रुपयांची यंत्रसामुग्री तसेच रेती, बजरी,गट्टू तसेच इतर साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त करून वन विभागाच्या डोंगरगाव येथील डेपो मध्ये जमा करण्यात आला व संबंधित कंपनीवर वन विभागाच्या नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास उपवनसंरक्षक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश जाधव करीत आहेत