मंदिरात चोरी करणार्‍याला 24 तासात अटक

गोंदिया ◼️ मालवीय शाळेच्या समोरील हनुमान मंदीरा समोरील दाराचा ताला तोडुन हनुमानजी चे डोक्यावरील चांदीचे छत, व दानपेटी तील रक्कम, तसेच चंद्रशेखर वार्ड, श्रीनगर बब्बा भवन जवळील शितला माता मंदीराचे समोरील दाराचा ताला तोडुन दानपेटीतील पैसे/ रककम मळी चौकाचे मागील मॉ दुर्गेशश्वरी मंदीराचे गेट चा ताला तोडुन मंदीरातील दानपेटी मधील पैसे/रक्कम कोणी तरी अज्ञात चोरट्यानी चोरी करून तिन्ही मंदिरा तील दानपेटीतील अंदाजे नगदी रक्कम 8,500/- रुपये, एक चांदीचा छत किमती 7000/- रूपये असा एकूण 15,500/- रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याने पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे अपराध क्रमांक 1)299/2023 कलम 457, 380 भादंवि 2)300/ 2023 कलम 457, 380 भादंवि 3)302/2023 कलम 457, 380 नुसार तीन वेगवेगळं गुन्हे दाखल करण्यात आले होते.
मा. पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. निखिल पिंगळे , अप्पर पोलीस अधीक्षक, श्री . अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपवि भाग गोंदिया श्री. सुनील ताजने यांनी वरील प्रमाणे एकाच रात्री गोंदिया शहरा तील तीन मंदिराचे टाळे तोडून मंदिरातील दानपेटी मधील पैसे/रक्कम, व चांदीचे छत चोरीचे गांभीर्य लक्षात घेता सदर संबंधाने मंदीर चोरीच्या गुन्हेगारांचा छडा लावून तात्काळ गुन्हेगारांना अटक करून गुन्हे उघडकीस आणण्या बाबत मार्गदर्शक सूचना देवून पोलीस ठाणे गोंदिया शहर प्रभारी,पो. निरिक्षक श्री.चंद्रकांत सुर्यवंशी यांना तसेच स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी श्री. दिनेश लबडे यांना याबाबत निर्देशित केले होते. या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे निर्देश व आदेशा न्वये वरील नमूद तिन्ही गुन्ह्यातील अज्ञात चोरट्या चा शोधाकरीता गोंदिया शहर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया असे वेगवेगळी पथके नेमण्यात आली होती. पो. निरिक्षक श्री. चंद्रकांत सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनात पो. ठाणे गोंदिया शहर चे गुन्हे प्रकटीकरण पथक तसेच पो.नि. श्री. दिनेश लबडे, स्थानिक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे नमूद तिन्ही गुन्ह्यातील अज्ञात चोरट्याचा शोध घेत होते. या अनुषंगाने स्थागु.शा.चे पोलीस पथक गुन्हेगारांचा शोध करीत असताना पथकास विश्वस नीय गुप्त बातमीदार कडून माहिती मिळाली की नामे राहुल ऊर्फ चोचो ओंकार कर यांनी दिनांक- 14+15/05/2023 रोजीचे रात्रो दरम्यान मंदिराचे दाराचे टाळे तोडून मंदिरातील दानपेटी मधील रकमेची तसेच चांदीच्या छताची चोरी केली असून नागपूरला पळून गेल्याची माहिती प्राप्त झाल्याने पथकाने मिळालेल्या विश्व सनीय माहितीच्या आधारे आरोपी नामे- राहुल उर्फ चोचो गेंदलाल ओंकारकर वय 24 वर्ष रा. नंगपुरा मुररी यास सापळा रचून भंडारा येथून ताब्यात घेण्यात आले. ताब्यांत घेण्यात आलेल्या संशयितास पो. ठाणे गोंदिया शहर परिसरा तील *1) हनुमान मंदीर 2) शीतला माता मंदिर 3) दुर्गेश्वरी मंदिर येथे* झालेल्या चोरी संबंधाने विश्वासात घेऊन चौकशी व विचारपूस केली असता संशयित आरोपी याने स्वतः तिन्ही मंदिरातील दानपेटी मधील पैसे/ रक्कम व चांदीचे छत चोरी केल्याचे कबूल केले. गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता नागपूरला पैसे खर्च केल्या चे सांगून गुन्ह्यातीलचोरीस गेलेला मुद्देमाल 1) हनुमान मंदिर येथील चोरीकेलेल्या रकमेपैकी 2000/- रू. 2) शीतला माता मंदिर येथील चोरी केलेल्या रकमे पैकी 800/- रूपये 3) दूर्गेश्वरी मंदिरातील दान पेटी मधील पैसे रक्कम चोरी पैकी 100/- रूपये असा एकूण 2900/- रुपयांचा मुद्देमाल आरोपी कडून गुन्ह्यात हस्तगत करून जप्त करण्यात आले आहे. आरोपीस पुढील कायदेशीर कारवाई करीता गोंदिया शहर पोलिसांचे स्वाधीन करण्यात आले आहे. नमूद गुन्ह्यांचा तपास माननीय वरिष्ठांच्या निर्देशांप्रमाणे व मार्गदर्शना खाली गोंदिया शहर पोलीस करीत आहेत. मा. वरिष्ठांचे निर्देश आदेशान्वये सदरची उल्लेखनिय कामगिरी स्था.गु.शा. चे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, यांच्या मार्गदर्शनात सहा.फौज.अर्जुन कावळे, पोहवा-राजेंद्र मिश्रा, महेश मेहर, भुवनलाल देशमुख, चित्तरंजन कोडापे, नेवाला ल भेलावे, लक्ष्मण बंजार तसेच तांत्रिक शाखेचे सपोनि श्री. शिद, यांचे मार्गदर्शनात पो. हवा दिक्षित दमाहे, प्रभाकर पलांदुरकर, धनंजय शेंडे, संजू मारवाडे, मोहन शेंडे, यांनी उत्कृष्ठ कामगिरी केलेली आहे. मा.वरिष्ठांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक व अभिनंदन केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share