गोंदिया जिल्हात वाळू घाटांचा लिलाव नसतांनाही महसुल वसुलीची १००% उद्दिष्ट पूर्ती

गोंदिया◼️जिल्ह्याला विपूल प्रमाणात गौण खनिज संपदा लाभली आहे. जिल्हा प्रशासनाला गौण खनिज लिलावातून दरवर्षी कोट्यवधी रुपयाचा महसूल प्राप्त होतो. गोंदिया जिल्हा खनिकर्म विभागाकडून तात्पुरते गौणखनिज परवानेअंतर्गत प्राप्त स्वामित्वधनः तसेच अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक करणार्‍यांवर कारवाई करून तब्बल 32 कोटी 60 लाख 70 हजार 265 रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आला. विशेषत: जिल्ह्यातील वाळू घाटांचा लिलाव झाला नसतानाही महसूल वसूल करून 110 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. यासोबतच मुरुमातूनही महसुलामध्ये भर पडत असते.

गेल्या वर्षामध्ये खनिकर्म विभागाकडून आठही तालुक्यांमध्ये गिट्टी खदाण, मुरूम तसेच वाळू वाहतुकीकरिता तात्पुरते गौण खनिज परवाने देऊन त्यातून कोट्यवधी रुपयांचा स्वामित्वधन गोळा केला आहे.

तालुकानिहाय दंड आकारणीच्या रकमेवर नजर टाकल्यास गोंदिया तालुक्यातील 59 प्रकरणी 87.2 लाख, अर्जुन मोर 24 प्रकरणातून 30.5 लाख, तिरोडा 18 प्रकरणातून 16.41 लाख, देवरी 13 प्रकरणातून 14.29 लाख, सालेकसा 19 प्रकरणातून 16.14 लाख आणि सडक अर्जुनी तालुक्यातील 15 प्रकरणातून 20.39 लाख असा तब्बल 32 कोटी 60 लाख 70 हजार 265 रुपयांचा महसूलाची शासनाच्या तिजोरीत भर पडली.

जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खनन प्रकरणातून दंडाच्या स्वरूपात वर्षभरात 32 कोटी 60 लाख 70 हजार 265 रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला. जिल्हा खनिकर्म विभागाला प्राप्त उद्दिष्टापैकी शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले असल्याचे जिल्हा खणीकर्म अधिकारी सचिन वाढीवे यांनी सांगितले.

महसूल वसुलीची उद्दिष्ट पूर्ती : सचिन वाढीवे
Share