देवरी 🚨भिषण अपघातात ३ ठार! अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या ट्रेलरनी ३ लोकांना चिरडले!
◼️अग्रवाल कंपनीने घेतला तिन लोकांचा बळी असा आरोप
देवरी ◼️महामार्गावर उड्डाण पुलाचे निर्माण कार्य अग्रवाल ग्लोबल कंपनी करीत असून, सुरक्षेतील त्रुटीमुळे मोठे मोठे खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. प्रोजेक्ट मॅनेजर यांना वारंवार खड्डे दुरुस्ती करायचा सांगितला जाते पण याकडे जाणून दुर्लक्ष केले जात असल्याचे स्थानिक लोकाचे आरोप आहे. प्राप्त माहिती नुसार, उड्डाणपूल निर्माण कार्य करणाऱ्या कंपनीच्या ट्रॅलर क्रा MH 46 H 2299 ने देवरी तालुक्यातील ग्राम शेरपार येथील रहिवाशी संजय गावड, वय32 वर्ष , पतिराम धनबाते व रामचंद,गवराणे हे मोटार सायकल क्रं MH 35 AK 9958 ला ट्रेलर च्या धडकेत ३ इसमाना चिरडल्याची घटना सायंकाळी 4 वाजताच्या दरम्यान देवपायली येथे घडली.
घटना स्थळावरुन ट्रेलर ड्रायव्हर फरार झाल्याने 2 तास महामार्गावर ट्राफिक जाम झाली होती.
अग्रवाल कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजर यांच्या लापरवाही मूळे हा अपघात झाल्याचे नातेवाईकांचे आरोप आहे देवपायली पासुन ते सशीकर मंदीर व दुग्गीपार पर्यंत रोड वर खड्डे च खड्डे पडले आहेत या खड्ड्यामूळे 7 दिवसात 4 मोटारसायकल स्वार यांचे अपघात झाले आहेत.