इमारतीच्‍या पार्किंगमध्‍ये प्रतिबंधित तंबाखूचा कारखाना; 22 पोते सुगंधित तंबाखू जप्त

नागपूर : नागपूरातील एका बिल्‍डींगच्‍या पार्किंगमध्‍ये अवैधरित्‍या तंबाखूचा कारखाना सुरू होता. या कारखान्‍यावर नागपूर गुन्हे शाखेच्‍या पथकाने छापा टाकून मुद्देमाल जप्‍त केला आहे. लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीतील येनुरकर बिल्डिंगमध्ये पार्किंग परिसरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा कारखाना सुरू होता. नागपूर गुन्हे शाखेला ही माहिती मिळताच या कारखान्यावर छापा टाकून कारसह १८ लाखांचा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. याप्रकरणी आरोपी रुपेश नंदनवार व दत्तू सराटकर यांना अटक करण्यात आली आहे.२२ पोत्यात भरून ठेवलेला या सुगंधित तंबाखूची किंमत बारा लाख रुपये एवढी आहे. या कारखान्याच्या सूत्रधार दुर्गेश अग्रवाल असून गेल्या काही महिन्यांपासून दुर्गेश प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा कारखाना चालवित होता. या ठिकाणाहून पोलिसांनी कार, सुगंधित तंबाखू, मशीन, रिकामी पाकिटे, झाकन आदी साहित्य जप्त केले आहे. तर या कारखान्याच्या सूत्रधार दुर्गेश अग्रवाल फरार असून त्याच्या शोध पोलीस घेत आहेत.

Share