गौण खनिज चोरांवर देवरी पोलिसांची कारवाई ! लाखोंचा मुद्देमाल जप्त

देवरी ◼️ देवरी तालुक्यात सध्या गौण खनिज आणि अवैध धंदे निर्भयपणे सुरू असतांना देवरी पोलिसांनी दि. १३/०५/२०२३ चे २०:०० वा. सुमारास पोलीस स्टेशन हद्दीत पोना सुधीर चंद्रशेखर जांगळे हे पोलीस स्टॉप सह पेट्रोंलीग करीत असतांना गुप्त माहितीचे आधारे आरोपी हा त्याचे ताब्यातील स्वराज कंपनीचे निळया रंगाचे विना क्रमांचे ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये अवैधरित्या गोणखनिज एक ब्रास रेती कि. ४,००० /- रू विना पास परवाना वाहतुक करतांनी मौजा मुंडीपार घाट जवळ मिळुन आल्याने आरोपी कडुन एक ब्रास रेती कि. ४,००० /- रू विना कंमाची ट्रॅक्टर व ट्राली किमती ५,००,०००/–रू असा एकुण ५,०४,००० /- रू माल जप्त करण्यात आला असुन फिर्यादी पोना सुधीर चंद्रशेखर जांगळे पोस्टे देवरी यांच्या रिपोर्टवरून पोस्टे देवरी येथे अप. क १४९ / २०२३ कलम ३७९ भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास सफौ / ६९९ ज्ञानेश्वर कुभरे, पोस्टे. देवरी हे करीत आहेत.

दुसरी कारवाई दिनांक १३/०५/२०२३ चे २०:३० वा. सुमारास पोना रामराव लिंबाजी कांदे हे पोलीस स्टॉप सह पालीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असतानी गुप्त माहितीचे आधारे आरोपी हा त्याचे ताब्यातील महींद्रा कंपनीचे लाल रंगाचे ट्रॅक्टर मध्ये अवैद्यरित्या गोणखनिज एक ब्रास रेती किंमत ४००० /- रू विना पास परवाना वाहतुक करतांनी मिळुन आल्याने आरोपी कडुन एक ब्रास रेती किंमत ४००० /- रू विना कंमाची ट्रॅक्टर व ट्राली किंमत ४,००,००० /- रू असा एकुण ४,०४,०००/–रू माल मोका जप्ती पंचनाम्या प्रमाणे जप्त केला असुन फिर्यादी पोना रामराव लिंबाजी कांदे यांच्या रिपोर्टवरुन पोस्टे देवरी येथे अप. क. १५० / २०२३ कलम ३७९ भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हाचा तपास पोना / १७७१ समरीत पो.स्टे. देवरी हे करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share