आयुक्त नयना गुंडे यांच्याहस्ते संजय बोंतावार सन्मानित
देवरी ◼️आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तसेच इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्यात एकूण 38 एकलव्य मॉडेल रेसिडेन्सीयल स्कूल सुरू असून या शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षा, भौतिक सोयी सुविधा बाबत चर्चा व मागणी, अभ्यासक्रम आढावा, सत्र 23-24 चे शैक्षणिक धोरण व नियोजन तसेच शाळा सुरळीतपणे सुरू राहण्याच्या दृष्टीने श्रीमती नयना गुंडे आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या संकल्पनेतून दिनांक 3 मे 2023 व 04 मे 2023 या कालावधीत राज्यातील सर्व प्राचार्य यांचे करिता दोन दिवसाची कार्यशाळाचे आयोजन महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण व संशोधन संस्था (मित्रा) नाशिक येथे आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यशाळेत श्री. अविनाश चव्हाण, उपायुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांनी सर्व प्राचार्याकडून शाळेतील समस्या जाणून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन केले तसेच श्री. तुषार माळी, उपायुक्त अप्पर आयुक्त (मुख्यालय) नाशिक यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन तसेच विविध विषयावर चर्चा करून प्राचार्यांची संवाद साधला. या कार्यक्रमात श्री. टी कलाथीनाथन (अकॅडमीक हेड), श्रीमती लासुरे यांची उपस्थिती लाभली.
या कार्यशाळेत उपस्थित झालेले सर्व प्राचार्य यांच्याशी श्रीमती नयना गुंडे (आयुक्त) आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक यांनी विविध विषयावर चर्चा करून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी यांच्या अधिनस्त येत असलेले एकलव्य मॉडेल रेसिडेन्सीयल स्कूल बोरगाव बाजार येथील सत्र 2022-23 मधील 17 आदिवासी विद्यार्थ्यांनी JEE च्या परीक्षेमध्ये यश संपादन केल्याबद्दल देवरी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी श्री. विकास राचेलवर यांचे प्रशंसा करत एकलव्य निवासी शाळा बोरगाव बाजार येथील प्राचार्य श्री. संजय बोंतावार यांना प्रशस्ती प्रमाणपत्र दिले. त्याचबरोबर सत्र 2021-22 मधील इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल शंभर टक्के लावल्याबद्दल शाळेचे प्राचार्य श्री. संजय बोंतावार व श्री. दीपक हुकरे यांना देखील प्रशस्ती प्रमाणपत्र देऊन याचप्रमाणे यानंतरही शाळेचा निकाल शंभर टक्के लागेल अशी अशा व्यक्त केली.