केशोरी येथे निर्धूर चुलीचे वाटप

अर्जुनी मोर : तालुक्यातील केशोरी पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस दादालोरा खिडकी योजणे अंतर्गत निर्धूर चूल वाटप कार्यक्रमाचे आयोजन पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय भिसे, महाराष्ट्र शेतकरी शेतमजूर विकास संस्था काटोलच्या देवयानी लोखंडे, डॉ. सतीश ढोके, डॉ. पिंकू मंडल, माजी जिप सभापती प्रकाश गहाणे, सरपंच नंदकुमार गहाणे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रथम दीपप्रज्वलन करून झाली. प्रसंगी केशोरीचे ठाणेदार सोमनाथ कदम व सहायक पोलिस निरीक्षक जोहेब शेख यांचा शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी कान्हाटोला व कन्हाळगाव येथील युवक, युवतींनी आदिवासींचे नृत्य सादर केले. दरम्यान, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 93 लाभार्थ्यांना निर्धूर चुली चे वाटप करण्यात आले. तसेच सुकन्या समृद्धी योजनाचे पुस्तक, आबा हेल्थ कार्ड, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य कार्डचे सुद्धा वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाणेदार सोमनाथ कदम यांनी मांडले. संचालन अनिल लाडे यांनी केले. आभार सहाय्यक पोलिस निरीक्षक जोहेब शेख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वतेसाठी पोलिस कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share