पगारवाढ करण्याकरिता ५ हजाराची लाच घेतांना वस्तीगृह अधिक्षक एसीबीच्या जाळ्यात

भामरागड :कंत्राटी चौकीदार या पदावर नियमित ठेवण्याकरिता व मानधनात दरमाह ३ हजार रुपये पगार वाढ करण्याकरिता ५ हजार रुपयाची लाच स्विकारणाऱ्या अधीक्षक समग्र शिक्षा अभियान भामरागड यांच्यावर कार्यवाही करण्यात आली.

सदर १२ एप्रिल २०२३ ला मौजा भामरागड येथील वसतिगृहातील स्वतःच्या विश्राम कक्षामध्ये कार्यवाही करण्यात आली. भिमराव उध्दव अवतरे (५३), पद- अधिक्षक, समग्र शिक्षा अभियान वस्तीगृह, भामरागड असे लाच स्विकारणाऱ्याचे नाव आहे.

माहितीनुसार तक्रारदार यांना त्याच्या मानधनात दरमाह ३ हजार रुपये पगार वाढ केल्याचा मोबदला म्हणून तसेच त्यांना कंत्राटी चौकीदार या पदावर नियमित ठेवण्याच्या कामाकरीता आरोपी भिमराव उध्दव अवतरे यांनी ५ हजार रुपये लाच रक्कमेची पंचसाक्षीदारासमक्ष मागणी करून सदरची लाच
स्विकारली. सदर घटनेसंदर्भात कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलमान्वये पोलीस स्टेशन भामरागड येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदर कारवाही पोलीस उप. अधिक्षक अनिल लोखंडे यांच्या मार्गदर्शनात पो.नि. शिवाजी राठोड, सफ प्रमोद ढोरे, पोहवा नध्य भोटे, राजु पदमगिरीवार, श्रीनिवास संगोजी, स्वप्निल बाबोळे, किशोर, जौजारकर, संदीप घोरमाड, किशोर ठाकुर, संदिप उडाण मपाशि विद्या म्हशाखेत्री, जोत्सना वसा, तुळशीराम नवघरे आदींनी केले.

Print Friendly, PDF & Email
Share