विद्युत पुरवठा सुरळीत करा अन्यथा ताला ठोको आंदोलन: भाजपचे महावितरणला निवेदन

◼️महावितरणच्या अनियोजित कार्यप्रणाली विरुद्ध भाजपचे अभियंत्याला निवेदन

देवरी ◼️जनसामान्य, शेतकरी व इतर ग्रामीण – नागरी सुविधांमध्ये येत असलेल्या विद्युत सुविधांचा पुरवठा सुरळीत करण्याबाबत भाजप तालुका देवरी यांनी कनिष्ठ अभियंता महावितरण यांना निवेदन दिले आहे.

महावितरणच्या विद्युत केंद्र, देवरी येथुन असुरळीतपणे विज पुरवठा करण्यात येत असून दिवसातून शेकडो वेळा विजेचा लपंडाव (ये-जा) सुरु असतो. त्यामुळे देवरी शहरातील व आजुबाजूच्या ग्रामीण भागातील लोकांच्या घरातील पंखे, फ्रिज, टिव्ही व अन्य विद्युत उपकरणे खराब झालेली आहेत तसेच लोकांचे तक्रारी सुध्दा आहेत.

याबरोबर शासकिय संकुल, नगर पंचायत संकुल व शैक्षणिक इमारतीमधील कित्येक संगणक, पंखे व टिव्ही विजेच्या सुरु असलेल्या लपंडावामुळे खराब झालेले असुन सदर संस्थेच्या मालमत्तेचं नुकसान झालेले आहे. विजेचं असंच लपंडाव सुरु राहीलं तर आणखी लोकांचे, स्थानिक खाजगी सरकारी कार्यालयातील विद्युत उपकरणे खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. देवरी विद्युत केंद्रातुन अखंडीतपणे, सुरळीतपणे विज पुरवठा देण्यात यावे. अन्यथा भारतीय जनता पार्टी तालुका देवरी कडुन आपल्या कार्यालयावर ताला ठोको आंदोलन करण्यात येईल. असे निवेदन देवरी येथील कनिष्ठ अभियंता महावितरण यांना देण्यात आले आहे.

भाजपा तालुका देवरी तर्फे यावेळी तालुकाध्यक्ष अनिलकुमार येरणे, महामंत्री प्रवीण दहीकर, जिल्हा सचिव यादवभाऊ पंचमवार, देवरीचे नगराध्यक्ष संजू उईके, नगरसेवक संजय दरवडे उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share