भरधाव टिप्परचे चाक निघाले

भंडारा: अवैधरित्या रेतीची ओव्हरलोड वाहतूक करणाèया भरधाव टिप्परचे समोरील दोन्ही चाके निखळल्याने टिप्पर थेट रुग्णालयाच्या आवारभिंतीवर धडकला. यात आवारभिंत तुटून जमिनदोस्त झाल्याची घटना तुमसर- भंडारा राज्यमार्गावरील डॉ. गादेवार रुग्णालयासमोर घडली. गजबजलेल्या या मार्गावर सुदैवाने मध्यरात्रीच्या सुमारस ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी टिप्परचालक निखिल ठवकर (25) रा. खापा याच्याविरूध्द तुमसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

भंडारा जिल्ह्यातील रेतीघाट बंद असल्याने मध्यप्रदेशातून रेतीची चोरटी वाहतूक केली जाते. अशीच अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारे टिप्पर रात्रन्दिवस शहरातून भरधाव वेगाने धावत असतात. 16 मार्च रोजी रात्री 1 वाजताच्या सुमारास रेती तुमसर येथून भंडाराच्या दिशेने निघालेला टिप्पर क्रमांक एमएच 40/एके 268 चे समोरील दोन्ही चाके निघून टिप्पर थेट डॉ. गादेवार रुग्णालयाची आवारभिंत तोडून आत शिरला. यावेळी आवारभिंतजवळील एक वृक्ष उन्मळून पडला, तर आवारभिंत जमीनदोस्त झाली. सुदैवाने घटनेच्या वेळी मध्यरात्रीच्या सुमारास कुणीही दवाखान्याबाहेर नसल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती तुमसर पोलिसांना होताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून टिप्परचालक निखिल ठवकर याच्यावर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले.

Print Friendly, PDF & Email
Share