शेतकऱ्यांना मका लागतोय ‘गोड’
◼️जिल्ह्यात तब्बल १६६० हे. क्षेत्रात लागवड ; धानाला बगल देत पिकांकडे कल
गोंदिया ■ धानाचे कोठार असलेल्या जिल्ह्यात आजही सर्वाधिक धान पिकाचीच लागवड केली जाते यात शंका नाही. मात्र आता जिल्ह्याती शेतकरी धानाला फाटा देत अन्य नगदी पिकांकडे वळताना दिसत आहे. हेच कारण आहे की, रब्बीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मका ‘गोड’ लागत असून तब्बल १६६०.३० हेक्टर क्षेत्रात मका पिकाची लागवड करण्यात आली आहे.
पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक धानाचीच लागवड केली जाते. त्यातही गोंदिया सोडते. जिल्ह्याची ओळख ‘धानाचे कोठार ‘ म्हणूनच सर्वदूर आहे. हेच कारण आहे की, गोंदियातील तांदूळ विदेशातही जातो. जिल्ह्यात धान पीक हेच पारंपरिक पीक म्हणून आता राहिले नसुन गोंदिया जिल्हातील शेतकरी कृषी क्षेत्रातील १६६०.३० हेक्टर क्षेत्रात मका नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पिकाची लागवड झाल्याचे दिसत नगदी पिकांकडे वळताना दिसत आहे.