सूर्याचा प्रकोप वाढला, कलिंगडाची दुकाने सजली!

◼️आमगाव देवरी रस्त्यालगत कलिंगडाची दुकाने सजली

देवरी : तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढत असून, सूर्याचा प्रकोप चांगलाच वाढल्याचे दिसून येत आहे. या सोबतच देवरी तालुक्यात कलिंगड दाखल झाले असून कलिंगडाची स्टॉल्स सजलेले दिसत आहे. सकाळपासूनच थोड्याफार प्रमाणात उन्हाचे चटके जाणवायला लागलेले आहेत. मार्च मधेच सूर्य आग ओकायला लागल्याचे दिसून येत आहे. मात्र, रात्री व पहाटेच्या सुमारास जाणवणारा वातावरणातील गारवा हिवाळ्याची जाणीव करून देत आहे.

दिवसा उन्हाचे चटके बसत असले तरी रात्रीला वातावरणात हलकासा गारवा जाणव आहे. महाशिवरात्रीनंतर उन्हाची तीव्रता वाढत जाते, असे वयोवृद्ध अनुभवातून सांगतात. त्याप्रमाणेच उन्हाचा कडाका वाढतच चालला आहे. यंदा ऋतूंचा लहरीपणा समजेनासा झाला आहे. पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीपासून तर थेट दिवाळीपर्यंत दमदार पावसाने सातत्याने हजेरी लावली होती.

Share