चिचगड पोलीसांचा उपक्रम, 185 झाडांना लावले रेडियम

देवरी ◼️देवरी तालुक्यातील चिचगड पोलिसांनी रस्ते अपघात टाळण्यासाठी 185 झाडांना व 125 विद्युत खांबांना रेडियम व दिशादर्शक फलक लावून जनजागृती करण्यात आली. सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलिसांप्रती आपुलकी निर्माण व्हावी, यासाठी जिल्हा पोलिसातर्फे कम्युनिटी पोलिसींगतंर्गत विविध उपक्रम जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधिकारी अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.

कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थी, जनतेच्या हिताकरिता विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चिचगडचे ठाणेदार शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिचगड पोलिसांनी रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी, वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी 1 मार्च रोजी 1/03/2023 रोजी चिचगड ते पिपरखारी, चिचगड ते बोरगाव बाजार, परसोडी मार्गावरील धोकादायक अश्या 185 झाडांना व 125 विद्युत खांबांना तसेच धोकादायक वळणावर रेडियम लावण्यात आले.

Print Friendly, PDF & Email
Share