वरुड कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय,पत्नीचा खावटीचा अर्ज वरुड न्यायालयाने नामंजूर केला,खावटीच्या प्रकरणात पतीला मिळाला मोठा दिलासा
◼️एडवोकेट अंकिता रा. जैस्वाल यांचा यशस्वी युक्तिवाद
PraharTimes
वरूड: पत्नीने तिच्यावर व तिच्या मुलीवर कौटुंबिक हिंसाचार झाला म्हणून तिला खावटी देण्यात यावी याकरिता वरुड न्यायालयात कलम 125 सीआरपीसी अंतर्गत पाच हजार रुपये प्रत्येकी असा खावटी रक्कम मिळण्याचा अर्ज केला होता, पत्नीने प्रस्तुत प्रकरणात म्हटले की ती कोणत्याही कामधंदा करीत नाही व सर्वस्वीरित्या ती पतीवर अवलंबून आहेत, तसेच पती हा उच्चशिक्षित असून हायस्कूलला शिक्षक आहे व त्याला पंधरा हजार रुपये पगार मिळतो व पतीकडे साठ लाखाचा बंगला व एक एकर शेत तसेच प्लॉट आहेत परंतु पत्नीने जे काही पतीचे उत्पन्न अर्जात नमूद केले ते सिद्ध केले नाही, उलट पतीचे स्वतःचे पगार पत्रक व इतर दस्तऐवज न्यायालयात युक्तिवादाच्या वेळेस एडवोकेट अंकिता रा. जयस्वाल यांनी दाखल करून न्यायालयाला सांगितले की पतीकडून पत्नीला पूर्वीच नऊ हजार रुपये खावटी रक्कम मिळत आहेत ती रक्कम पत्नीने प्रस्तुत अर्जात न्यायालयात लपवलेली आहेत तसेच पतीने पत्नी विरुद्ध कौटुंबिक हिंसाचार संबंधित रिपोर्ट सुद्धा पोलीस स्टेशनला दिलेले आहेत, एडवोकेट अंकिता रा. जैस्वाल यांनी युक्तिवाद करताना न्यायालयात म्हटले की पतीकडे जास्त उत्पन्न नाही व त्याला पत्नीला व मुलीला नऊ हजार रुपये खावटी देऊन जी काही रक्कम उर्वरीत आहे त्यात स्वतःच्या उदरनिर्वाह व म्हाताऱ्या आईच्या पालन पोषणाची जिम्मेदारी सुद्धा पतीवर आहेत. या सर्व गोष्टी एडवोकेट अंकिता रा. जयस्वाल यांनी माननीय सर्वोच्च न्यायालय व माननीय उच्च न्यायालय यांचे न्यायनिवाडे देऊन यशस्वीरित्या युक्तिवाद करताना नमूद केल्या.
पतीला या प्रस्तुत प्रकरणात दि. 27 फेब्रुवारी 2023 ला माननीय श्री लंकेश्वर साहेब सहन्यायाधीश तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी वरुड न्यायालय यांनी खूप मोठा दिलासा दिला आहेत तसेच पत्नीचा खावटीचा अर्ज नामंजूर केला आहेत.