देवरी ◼️ मागील काही दिवसात देवरी शहरात चोऱ्यांच्या घटनेत वाढ झाली आहे. यामध्ये मोटार सायकल, मोबाईल फोन चोरीला जाण्याचे घटना ताजे असतांना आज (१ मार्च) दुपारी २ च्या सुमारास देवरी शहरातील त्रिमूर्ती नगर येथील रहवासी रमण चुटे यांच्या घरी चोरट्यांनी हातसाफ केला आहे.
प्राप्त माहितीनुसार दुपारी घरी कुणी नसतांना बंद कुलुप तोडून लाखो रुपयाच्या सोन्याचे दागिने चोरी गेल्याची माहिती मिळाली आहे. सदर घटनेचा तपास देवरी पोलीस करीत आहेत.








