जागृत पालक सुदृढ बालक अभियाना अंतर्गत 79,664 बालकांची आरोग्य तपासणी
गोंदिया ◼️जागृत पालक तर सुदृढ बालक अभियाना अंतर्गत आता पर्यंत 79,664 बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहिति जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितिन वानखेडे यांनी दिली आहे.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने 9 फेब्रुवारीपासून जागृत पालक सुदृढ बालक अभियान राबविण्यात येत आहे. दोन महिने राबविण्यात येणाऱ्या या अभियानासाठी 272 आरोग्य पथक तयार करण्यात आले असुन त्यात राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत वैद्यकिय अधिकारी, सामुदायिक आरोग्य अधिकारी , भरारी पथकाचे मानसेवी वैद्यकिय अधिकारी यांच्या मार्फत जिल्ह्यातील बालकांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहीती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील शून्य ते सहा वर्ष वयोगटातील अंगणवाडी,बालवाडी व खाजगी नर्सरीतील 1,07,644 बालकांची तपासणी करण्यात येणार आहे तसेच 6 ते 18 वर्ष वयोगटातील शासकिय , खाजगी शाळा, अनुदानित शाळा ,दिव्यांग शाळा व आश्रमशाळेतील विद्यार्थांची तसेच शाळा बाह्य मुले व मुलांची 2,37,265 असे एकुण 3,44,909 विद्यार्थांची तपासणी करण्यात येणार आहे.
गोंदिया जिल्ह्यात शासकिय शाळा 1088, खाजगी शाळा 249, अनुदानित शाळा 261, दिव्यांग शाळा आश्रमशाळा 53, अंगणवाडी/बालवाडी 1902, खाजगी नर्सरी 12 ईत्यादी मधुन 272 वैद्यकारी पथक शाळानिहाय भेटी देवुन तपासणी करण्यात येणार आहे.
जागरूक पालक सुदृढ बालक अभियाना अंतर्गत आरोग्य पथकाच्या माध्यमातून शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील बालकांचे आरोग्य तपासणी करण्यात येणार असुन बालकांना आजार आढळल्यास त्यावर आरोग्य विभागामार्फत मोफत तपासणी,उपचार आणि गरज भासल्यास मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
-डॉ. नितीन वानखेडे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया