बोरतलाव-चांदसुरज दरम्यान नक्षल फायरींग दोन पोलीस शहीद,एक जखमी

गोंदिया 20 : चहापानासाठी जाणाऱ्या पोलिसांवर दहा ते बाराच्या संख्येत असलेल्या महिला नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. यात दोन पोलिसांचा मृत्यू झाला. ही घटना आज सोमवार २० फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता महाराष्ट्र- छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातील बोरतलाव पोलिस चौकी अंतर्गंत घडली. घटनेनंतर महाराष्ट्र व छत्तीसगड सीमेवर पोलिसांनी बंदोबस्त वाढविला असून जंगलात सर्चिंग सुरु केली आहे.

mnbytg

मिळालेल्या माहितीनुसार आज सोमवारी बोरतलाव पोलिस चौकीतील राजेश प्रतापसिंह व ललीत यादव आपल्या एका सहकारी मित्रांसह दुचाकीने चाय पिण्याकरीता पोलिस चौकी पासून मुख्य राज्य मार्गावर असलेल्या ढाब्याकडे जात असताना आधीच परिसरात दबा धरुन बसलेल्या महिला नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तिसरा जखमी असून जखमी शिपायामुळेच ही घटना पोलिसांना कळल्याचे वृत्त आहे. घटनेनंतर महिला नक्षलवाद्यांनी दुचाकीला आग लावून घटनास्थळावरुन बोपारा केला. महाराष्ट्र-छत्तीसगड राज्य पोलिस नक्षल्याचा शोध घेत आहेत.

Share