स्पर्धेच्या युगात महिलांना घाबरण्याची गरज नाही – सविता पुराम
सालेकसा◼️वर्तमान काळात स्पर्धेच्या युगात महिलांनी पुढाकार घेण्याची काळाची गरज आहे आपल्या समस्या अडचणी प्रत्येक महिलांनी समोर येऊन मांडण्याची आवश्यकता आहे महिलांना घाबरण्याची गरज नाही आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत असे प्रतिपादन महिला व बालकल्याण सभापती जिल्हा परिषद गोंदिया सविता पुराम यांनी आयोजित महिला मेळाव्यात व्यक्त केले.
सालेकसा तालुक्यातील हलबीटोला येथील श्री अर्धनारेश्वरालय शिवगण मंगल भवन येथे महिला मेळावा कार्यक्रम महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून सदर कार्यक्रमाला तालुक्यातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, अंगणवाडी मदतनीस असे अंदाजे तीनशे महिलांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली होती. कार्यक्रमाचे औचित्य साधून महिलांच्या वतीने गीत संगीत सामूहिक नृत्य प्रस्तुत झाले, उपस्थित सर्व महिलांना हळदीकुंकू करून वाण देण्यात आले. यावेळी सीडीपिओ आर.जे.चौव्हान, पर्यवेक्षिका अंजली बावनकर, सुशीला भंडारी, मंगला पाखमोडे, स्मिता कटरे,रागिनी वाघाडे, अंगणवाडी सेविका नंदा मेश्राम, अंगणवाडी मदतनीस अनुबाई हत्तीमारे, आशा वर्कर मुनेश्वरी कावळे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका मीरा मेश्राम तर आभार समन्वयक बावनकर यांनी मांडले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व महिलांनी सहकार्य केले.