पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल हरीश मोटघरे यांचा सुवर्णपदक देऊन सत्कार

गोंदिया ◼️शिक्षणमहर्षी मनोहरभाई पटेल यांच्या ११७ व्या जयंतीनिमित्त गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांसोबतच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यात गोंदियासारख्या आदिवासीबहुल नक्षलग्रस्त जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रात दशका पासून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, शासकीय क्षेत्रांतील बातम्या जनसामान्यांपर्यंत पोहोचविणारे हरीश मोटघरे यांना सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. प्रफुल्ल पटेल, सिनेअभिनेते जॅकी श्राफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उद्योगपती सज्जन जिंदल, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खा. विजय दर्डा, आ. विनोद अग्रवाल, आ. विजय रहांगडाले, माजी मंत्री परिणय फुके, राजकुमार बडोले, माजी आमदार राजेंद्र जैन, गोपालदास अग्रवाल उपस्थित होते.

हरीश मोटघरे यांच्या सन्मानार्थ मिडिया आणि पत्रकारिता तसेच सामाजिक क्षेत्रातील लोकांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. मनमिळावू व्यक्तिमत्त्व म्हणून हरीश यांची ओळख आहे.

Print Friendly, PDF & Email
Share