राष्ट्रिय महामार्गाच्या दिशादर्शकांवर राजकिय नेत्याचे अतिक्रमण , दिशादर्शकांवर सजविले स्वतःचे बॅनर
◼️कचारगड यात्रेच्या शुभेच्छा देण्यासाठी महामार्गाच्या दिशादर्शकचा वापर, दिशादर्शकावर राजकिय प्रचार
देवरी▪️ नुकतेच कचारगड यात्रेचे समारोप झाले असून लाखो भाविकांनी आदिवासीचे दैवत आणि तीर्थक्षेत्र कचारगड ला हजेरी लावली होती. आदिवासी संस्कृति आणि परंपरेला मजबूत करण्यासाठी कचारगड येथे लाखोच्या संखेने १८ राज्यातील आदिवासी बांधव हजेरी लावतात. परंतु राजिकीय नेत्यांच्या लावलेल्या बॅनरमुळे देवरी आमगाव सालेकसा तालुक्यात जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
स्वतःला खूप मोठा पॉवरफुल आणि लोकप्रिय नेता समजणाऱ्या नेत्यांनी आपली प्रसिद्धी करण्यासाठी चक्क देवरी -आमगाव -सालेकसा महामार्गावरील दिशादर्शकावर आपले बॅनर लावले असून यामुळे गावांची नावे आणि किलोमीटर तसेच दिशा झाकलेल्या आहेत. यामुळे कचारगड यात्रियांना कमालीचा त्रास झाल्याचे वृत्त आहे. कचारगड यात्रेची गर्दीचे नियोजन म्हणून जिल्हा प्रशासनाने आमगाव सालेकसा डोंगरगड मार्गावरील वाहतूक आमगाव-देवरी- डोंगरगड अशी केली होती.
नियमानुसार राष्ट्रिय आणि राज्य महामार्गाच्या दिशा दर्शकावर कुठलेही बॅनर आणि प्रसीद्ध पत्रक लावला येऊ शकत नाही परंतु कचारगड यात्रेच्या शुभेच्छा देण्यासाठी या फलकांचा आणि दिशादर्शकांचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात्रा संपलेली असून सुद्धा सदर बॅनर्स आणि हॉर्डिंग्स अजूनही काढण्यात आले नसल्यामुळे जिल्हात जोरदार चर्चा सुरु आहेत.
काही ठिकाणी स्थानिक नेत्यांनी ग्रामपंचायतीच्या हद्दीत विनापरवानगी (NOC) आपले बॅनर सजविलेले असून सिमेंट काँक्रीट टाकून आपल्या बॅनरचे लोखंडी फ्रॅम बसविलेले दिसून येते. नियमांनुसार कुठलेही बैनर लावण्यासाठी ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे यावरुन ग्रामपंचायत हद्दीत चक्क अतिक्रमण झाल्यामुळे तालुक्यात हा सुद्धा चर्चेचा विषय ठरला आहे.