देवरी तालुक्यातील आदर्श आमगाव- मुरदोली रस्त्याची दुरावस्था, लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष

देवरी : तालुक्यातील आमगाव (आदर्श) ते मुरदोली या मुख्य रस्त्याचे नवीन बांधकाम सुरू होऊन काही कारणास्तव या रस्त्याचे बांधकाम करण्यास काही कारणास्तव उशीर होत असल्यामुळे येणाºया जाणाºया नागरिकांना कमालीची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अपघााताची शक्यता नाकारता येत नाही. यावर सदर कारवाई करून थांबलेल्या रस्त्याचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी या क्षेत्रातील नागरिकांनी वरिष्ठाकडे केली आहे.
मुरदोली ते आमगाव (आदर्श) या मुख्य रस्त्याचे काम मार्च ते एप्रिल 2022 दरम्यान सुरू करण्यात आले असता अंदाजे 2 ते 2.500 किमी अंतरापर्यंत रस्त्याला जेसीबीच्या साहाय्याने खोदण्याचे काम करण्यात आले व त्यापैकी अंदाजे 1 ते 1.500 किमी अंतरापर्यंत गिट्टी पसरवून त्यावर मुरूम टाकण्याचे कामे करून काम बंद करण्यात आले. तेव्हापासून सदर काम बंद असल्यामुळे पावसाळ्यातील पावसाने रस्त्यावरील मुरूम वाहून गेल्याने गिट्टी उघड पडली आहे. रस्त्यावरून जाणाºया येणाºयांना अत्यंत त्रास होत आहे. या रस्त्याने कितीतरी विद्यार्थी सुद्धा शाळेत जात असतात. त्यांना सुद्धा खूप त्रास सहन करावा लागतो. तसेच मोलमजुरीकरिता जाणाºया मजुरांना खूप त्रास भोगाव लागतो. या रस्त्यावर आतापर्यंत कितीतरी लहान-मोठे अपघात झाले असून कसल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. परंतु, दिवसेंदिवस रस्ता हा अत्यंत खराब होत असल्यामुळे जीवित हानी होणे सुद्धा नाकारता येत नाही. रस्त्याचे बांधकाम लवकरात लवकर करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तेथील नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.

Share