उप मुख्यालय देवरी अंतर्गत कम्युनिटी पोलीसिंगच्या माध्यमातून तसेच ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमीत्याने विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

◼️उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांचे संकल्पनेतून पो . ठाणे नवेगावबांध, चिचगड, केशोरी, स. दु. धाबेपवनी, मगरडोह, बोंडे, भरणोली येथे विविध उपक्रम

देवरी◼️पो.ठाणे नवेगावबांध, चिचगड, केशोरी, स. दु. धाबेपवनी, मगरडोह, बोंडे ,भरणोली मार्फत स्तुत्य उपक्रम राबविण्यात आले. कम्युनिटी पोलिसिंग च्या माध्यमाने तसेच २६ जानेवारी ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गोंदिया जिल्हयातील देवरी उपविभागातील पो . ठाणे नवेगावबांध अंतर्गत सशस्त्र दूरक्षेत्र धाबेपवनी, पो . ठाणे चिचगड अंतर्गत स.दूरक्षेत्र मगरडोह, पो. ठाणे केशोरी अंतर्गत स.दूरक्षेत्र भरणोली येथे मा. पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया कॅम्प देवरी श्री. अशोक बनकर सा., उपविभागीय पोलीस अधीकारी, देवरी श्री. संकेत देवळेकर सा., यांचे संकल्पनेतुन व मार्गदर्शना खाली दिनांक -२४,२५,२६ जानेवारी २०२३ दरम्यान विविध स्पर्धा, व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने पोलीस ठाणे नवेगावबांध सशस्त्र दूरक्षेत्र धाबेपवनी पोलीस दलातर्फे २६ जानेवारी ७४ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन माधवराव पाटील डोंगरवार विद्यालय, स्वामी विवेकानंदआदिवाशी आश्रमशाळा धाबेपवनी येथील शालेय विद्यार्थ्यांच्या क्रिडा स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व सास्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्री.संजय पांढरे, ठाणेदार नवेगावबांध यांनी ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमीत्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमा दरम्यान गावातील प्रतिष्ठित नागरीक, स्वामी शाळा धाबेपवनी येथील शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन जीवनातील खेळाचे महत्व पटवुन देताना विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास जागृत करण्यासाठी खेळाविषयी स्वताचे अंगी असलेले विशेष प्राविण्याला वाव द्यावा. वेगवेगळ्या क्षेत्रातील क्रिडा स्पर्धांत भाग घेऊन यश संपादन करण्यासाठी स्वतःमधील न्युनगंड बाजुला ठेऊन विद्यार्थांना कठोर परीश्रम करण्याबाबत महत्व पटवुन देऊन विद्यार्थांना व स. दु. हद्दीतील नागरीकांना नक्षलवाद्यांच्या भुलथापांना बळी न पडता मुळ प्रवाहात आणण्याच्या दृष्टीकोनातुन शासन व पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच शालेय क्रिडा स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धांत विजेत्यांना बक्षिस आणि अल्पोहार वाटप करण्यात आला. *त्याचप्रमाणे पोलीस ठाणे चीचगड अंतर्गत सशस्त्र दुरक्षेत्र मगरडोह, बोंडे पोलीस दलातर्फे स्थानिक नागरिकांकरीता *संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात येवून* नागरिकांशी संवाद साधून

नागरिकांना शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. पोलीस प्रशासना प्रती आपुलकीची भावना निर्माण करण्यात आली. स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मगरडोह, बाळापुर, चुंबळी, चिलम टोला येथील विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होत्या. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थी यांना आकर्षक बक्षिसांचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे पो.ठाणे केशोरी अंतर्गत सशस्त्र दुरक्षेत्र भरणोली पोलीस तर्फे हद्दीतील नक्सलग्रस्त भागातील शालेय मुला मुलींच्या दि .24 ,25, 26 जानेवारीला विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये कब्बडी स्पर्धा ,संगीत खुर्ची निबंध स्पर्धा,रांगोळी ,चमचा गोळी ,खो खो, तशेच सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले व स्पर्धेतील सर्व मुला मुलींना पोलीस विभागा तर्फे विविध पारितोषिके देण्यात आली तसेच शाळेतील मुला- मुलींना पोलीस विभागा तर्फे गोड जेवणाची व्यवस्था करण्यात आली . पोलीस दलातर्फे आयोजित विविध स्पर्धा , सांस्कृतिक कार्यक्रमाचे अनुषंगाने मोठ्या संख्येने शाळेतील विद्यार्थी मुले मुली, शिक्षक, नागरिकांनी सहभाग नोंदविला. केलेल्या उत्तम आयोजना बद्दल विद्यार्थी, शिक्षक, नागरिकांनी आनंद व्यक्त केला मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनात कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री संकेत देवळेकर यांचे संकल्पनेतून पो . ठाणे नवेगावबांध, चिचगड, केशोरी, स. दु. धाबेपवनी, मगरडोह, बोंडे, भरणोली येथील प्रभारी पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम घेवून उत्कृष्ठरित्या कार्यक्रम,स्पर्धेचे उत्तमरित्या आयोजन केले. केलेल्या कामगिरीचे स्तुत्य उपक्रमाचे पोलीस अधीक्षक गोंदिया यांनी प्रशंसा केली आहे.

Share