रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानानिमित्त जिल्हा वाहतूक शाखेचा स्तुत्य उपक्रम
देवरी◼️मोटार वाहनास अपघातात परिणामकारक रीत्या आळा बसावा व नागरिकां मध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार होण्याकरिता शासनाच्या निर्देशानुसार दिनांक 11 जानेवारी 2023 ते दिनांक 17 जानेवारी 2023 या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले.
पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनात या अभियाना दरम्यान जिल्हा वाहतूक शाखे कडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
त्यामध्ये विशेष मोहिमे अंतर्गत मोटर वाहन कायद्या खाली पेड व अनपेड अशा एकूण 1369 इतक्या केसेस करून 05,79,450/- रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.
त्यामध्ये विना नंबर प्लेट वाहन चालवणे, लायसन्स सोबत न बाळगणे, विना सिट बेल्ट वाहन चालविणे, वाहतूक चिन्हाचे उल्लंघन करणे, सिग्नल जम्पिंग, क्षमते पेक्षा अधिक प्रवासी वाहून नेणे या सदराखाली केसेस करण्यात आल्या.
मरारटोली जंक्शन, बसस्थानक, मुख्य बाजार पेठ, जयस्तंभ चौक या ठिकाणी चौक सभा घेऊन ऑटो रिक्षाचालक व इतर वाहन चालकांना मोटार वाहन कायदा व सुरक्षित रित्या वाहन चालवण्या बाबत माहिती देण्यात आली.
शहरातील मुख्य ठिकाणी वाहतूक नियमा संबंधीचे बॅनर्स लावण्यात आले. त्याच बरोबर वाहतूक नियमा संबंधी माहिती पत्रके सुद्धा वाटण्यात आली.
रस्ता सुरक्षा विषयावर गोंदिया शहरातील विवेक मंदिर स्कूल, लिटिल फ्लावर स्कूल, प्रोग्रेसिव्ह स्कूल, गोंदिया पब्लिक स्कूल, सेंट झेवियर स्कूल, पोद्दार स्कूल, शारदा कॉन्व्हेंट स्कूल, सिंधी स्कूल व गुजराती स्कूल अशा 10 शाळेतील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमा संबंधाने प्रबोधन व जनजागृती करण्यात आली.
वाहनांचे अपघात टाळण्यासाठी दुचाकी, तीनचाकी व इतर वाहने त्याचबरोबर सायकल रिक्षा अशा सुमारे 200 वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले. त्याचप्रमाणे गोंदिया शहरा तील मुख्य ठिकाणी पोलीस ठाणे, इतर महत्त्वाची शास कीय कार्यालय, हॉस्पिटल्स, ॲम्बुलन्स सेवा, क्रेन यांचे संपर्क नंबर, तसेच हेल्प लाइन नंबर यांचे माहिती दर्शवणारे बोर्ड लावण्यात आले.
वाहतूक नियमासंबंधी जनजागृती करण्याकरिता शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. सदर रॅलीमध्ये सुमारे 10 शिक्षक व 150 विद्यार्थी सहभागी झालेले होते. त्याचबरोबर पो. स्टे गोंदिया शहर व पो. स्टे रामनगर यांच्या संयुक्त सहभागातून गोंदिया शहरात पोलीस अंमलदारांची बाईक रॅली काढण्यात आली. यामध्ये सुमारे 50 पोलीस अंमलदार सहभागी झालेले होते.
शालेय विद्यार्थ्यांना जयस्तंभ चौकात वाहतूक सिग्नल चालविण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच या अभियाना दरम्यान शालेय विद्यार्थ्यां करिता चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
रस्ता सुरक्षा सप्ताह मोहीम राबविण्याचे उत्कृष्ठरित्या आयोजन मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. महेश बनसोडे यांचे नेतृत्वात व मार्गदर्शनात वाहतूक शाखेतील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केले आहे.