११ हजाराची लाच घेताना ग्रामसेवक एसिबी च्या जाळ्यात

सालेकसा◼️शाळा रंगो रंगोटी व नालीसफाईचे कामाचे तीन लक्ष रुपयाची कामाचे बिल व मनरेगा अंतर्गत केलेल्या कामाचे बिल मंजूर करून समोर पाठवण्याकरिता अकरा हजार रुपयाची लाच स्वीकारताना लटोरी येथील ग्रामसेवक सुनील ईश्वरदास दोनोडे गोंदिया लाच लूपत प्रतिबंधक विभागाचे जाळ्यात अडकला आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया तर्फे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार नुसार लटोरी येथील रहिवासी तक्रारदार यांनी ग्रामपंचायत लटोरी तालुका सालेकसा जिल्हा गोंदिया यांनी ग्रामपंचायत लटोली अंतर्गत असाई टोला शाळेचे रंगरंगोटीचे काम दोन लक्ष रुपये तसेच नालीसफाई चे काम एक लक्ष रुपये असे तीन लक्ष रुपयाचे काम पूर्ण करून लटोरी ग्रामपंचायत अंतर्गत मनरेगाचे पांदण रस्त्याची दहा कामे पूर्ण केली असून ग्रामसेवक सुनील दोनोडे यांनी या कामाचे बिल मंजूर करून पुढे पाठवण्याकरता बारा हजार रुपयाची मागणी केली असता तरजोड करून 11000 रुपये स्वीकारताना आज दिनांक 19 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया तर्फे ग्रामपंचायत लटोरी येथे सापळा रचून ग्रामसेवक सुनील दोनोडे यांचे कक्षात लाच स्वीकारताना ताब्यात घेतले असून पोलीस स्टेशन आमगाव येथे ग्रामसेवका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाही लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गोंदियाचे उपअधीक्षक पुरुषोत्तम आहेरकर ,पोलीस निरीक्षक अतुल तवाडे, सहायक फौजदार विजय खोब्रागडे ,हवालदार संजय बोहरे ,नायक पोलीस शिपाई संतोष शेंडे, मंगेश कहालकर ,संतोष बोपचे ,अशोक कापसे ,चालक दीपक बतबरवे यांनी केली.

Share