पुन्हा एकदा शाळेत जावसं वाटतं

कवि- सुदर्शन एम. लांडेकर देवरी

पुन्हा एकदा लहान होऊन शाळेत जावसं वाटतं
शाळेच्या जुन्या आठवणीत रमावस वाटतं
गुरुजी च्या हातचा मार खावसं वाटतं
मित्रासंग इकडे तिकडे उनाडक्या करावसं वाटतं
मला पुन्हा एकदा शाळेत जावसं वाटतं….

पिटी च्या तासाला धिंगाणा करावसं वाटतं
पोटात दुखते म्हणून सुट्टी मारावंसं वाटतं
शाळेला सुट्टी कधी कधी होते ही वाट पहावसं वाटतं
पंधरा ऑगस्ट च्या दिवशी नवीन गणवेश घालावासा वाटतं
मला पुन्हा एकदा शाळेत जावसं वाटतं….

शाळेतल्या बाईची नक्कल करावसं वाटतं
गुरुजींनी शिक्षा दिल्यावर कोंबडा बनावसं वाटतं
दररोज सकाळची प्रार्थना म्हणावसं वाटतं
मित्राच्या आठवणीत जगावसं वाटतं
मला पुन्हा एकदा शाळेत जावसं वाटतं….

फळ्यावर चित्र काढावस वाटतं
शाळेला बुट्टी मारून मित्रासंग फिरायला जावस वाटतं
शाळा संपल्यावर शुभम करोति मनावस वाटतं
एकदा तरी तिरंगा झेंडा हातात घेऊन फडकावंसं वाटतं
मला पुन्हा एकदा शाळेत जावस वाटतं…..

शाळेतील सहलीत जावस वाटत
आपल्या खास मित्रासंग पुन्हा मुक्तपने संचार करावस वाटत
वर्गात नेहमी पहिला ला क्रमांक पटकावंसं वाटत
स्वतःला शाळेतील हुशार विद्यार्थी असं ऐकावंसं वाटत….

मला पुन्हा एकदा शाळेत जावसं वाटतं
मला पुन्हा एकदा शाळेत जावस वाटत…..

Share