हातभट्टी दारू तयार करणाऱ्या ठिकाणावर छापा 1,21,320/- रूपयाचा मुद्देमाल जप्त

गोंदिया◼️ जिल्ह्यात अवैधरीत्या मोहफुलाची हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश मा. पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखिल पिंगळे सा. यांनी दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे ,अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया कॅम्प देवरी श्री. अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया श्री.ताजने यांनी दिलेल्या आदेशानुसार गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक अजय भुसारी यांचे नेतृत्वात मौजा.कारंजा डव्वा रोड येथे अवैधरित्या मोहफुलाची हातभट्टी लावून दारू गाळणाऱ्या व विक्री करणाऱ्यावर, दिनांक 07/01/2023 रोजी सकाळी छापा कारवाई केली. यामध्ये 100 लिटर मोहफुलाची हातभट्टीची दारू , 950 किलो सडवा मोहफुल रसायन व साहित्य, असा एकूण किंमत 1,21,320/- रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आले. मोहाफुलाचे रसायन, आणि हातभट्टी निर्मिती चे साहित्य नाश करण्यात आले आहे.

1) गुलचंद प्रकाश उके
2) सेवेंद्र सकटु ताराम
3) मयूर शिवप्रसाद नेवारे
4) अक्षय राजेश राऊत
सर्व रा. कारंजा
या आरोपी विरुद्ध पो.ठाणे गोंदिया ग्रामीण येथे कलम 65 ()()()()() महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे अप. क्र.11/2023 गुन्हा नोंदविण्यात आले आहे.

Share