ओळखलात का ‘या’ अभिनेत्याला?


हल्ली सर्वच अभिनेते नवनवीन लुक्स स्वतःवर प्रयोग करत असतात आणि खूपदा हे लूक्स त्यांचा व्यक्तिमत्त्व वाढवत असतात. आता हेच बघा न या अभिनेत्याची तुलना थेट हॉलीवूड अभिनेत्यायाबरोबर होत आहे. बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपालनेही स्वतःवर हा नवा हेअर फ्लॉन्ट लुक केला आहे.

याआधीही अर्जुनने स्वतःवर अनेक प्रयोग केले आहेत. प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट आलिम हकिमने अर्जूनचा हा नवा लूक आणण्यात परिश्रम घेतले आहे. चाहत्यांनी या नवीन लूकला खूप प्रतिसाद दिला आहे.चाहत्यांनी अर्जुनला नवीन लूक बद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. काही लोकांनी अर्जुनाच्या केसांची तारीफ केले तर काही लोकांनी चक्क हॉलीवूड अभिनेत्यासारखे दिसत आहे असे कॉमेंट दिले.

अर्जुनने हा नवा लुक त्याच्या येणाऱ्या नवीन चित्रपटासाठी केला आहे. लवकरच तो ‘धाकड’ या चित्रपटात अभिनेत्री कंगना राणावत सोबत दिसणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share