पत्रकार हा समाजाचा आरसा आहे- अप्पर पोलीस अधिक्षक अशोक बनकर

◼️पत्रकार दिनानिमित्त पोलीस स्टेशन देवरी येथे तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार

देवरीः पोलीस स्टेशन देवरी येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती प्रसंगी मराठी पत्रकार दिनानिमित्त ‘पत्रकार दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलीस अधिक्षक अशोक बनकर, नवनियुक्त पोलिस निरीक्षक प्रविण डांगे, सपोनि आनंदराव घाडगे मंचावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला तालुक्यातील संपादक उपसंपादक तसेच विविध माध्यमांचे पत्रकार आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांना संबोधले जाते आणि पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. पोलीस आणि नागरिकांना जोडणारा पत्रकार हा दुवा आहे त्यामुळे पत्रकारांचे समाजातील स्थान अनन्यसाधारण आहे असे विचार अशोक बनकर यांनी यावेळी व्यक्त केले.

दरम्यान सर्व उपस्थित पत्रकारांचा पेन व डायरी देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकार आणि पोलीस अधिकारी यांच्यात दिलखुलास चर्चा झाली. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पोलीस निरिक्षक प्रवीण डांगे यांनी केले असून आभार प्रदर्शन सपोनि आनंदराव घाडगे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशासाठी पोलीस कर्मचारी नरेश गायधने, पोहदेसाई, पोह शेंडे, पोह मेंढे आदी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Share