केशोरी पोलीस स्टेशनने शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत साजरा केला ‘पोलीस स्थापना दिवस’
गोंदिया◼️’ ‘महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस’ केशोरी पोलीस स्टेशन येथे साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने केशोरी पोलीस स्टेशन तर्फे शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, ईळदा ता. अर्जुनी मोर येथील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, सायबर क्राईम, महिला सुरक्षा, व्यसनाधीनता व वाहतूक सुरक्षा या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोमनाथ कदम, पोलीस हवालदार दीपक खोटेले व सुशील रामटेके तसेच शाळेचे मुख्याध्यापक दुबे सर, सर्व शिक्षक वर्ग व 100 विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यशाळेचे आयोजन पोलिस अधीक्षक गोंदिया श्री. निखिल पिंगळे (IPS) , अप्पर पोलिस अधीक्षक, कॅम्प,(देवरी), मा.श्री.अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी, श्री संकेत देवळेकर यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार सोमनाथ कदम, पोलीस हवलदार दीपक खोटेले व सुशील रामटेके यांनी केले होते.