ब्लॉसम स्कूलमधे वीर बाल दिवस साजरा
देवरी ◼️गुरू गोविंद सिंग यांनी धर्मरक्षणासाठी आपल्या कुटुंबाचा त्याग केला. धर्मरक्षणासाठी त्यांचे चार पुत्र शहीद झाले. गुरु गोविंद सिंग यांचे दोन पुत्र 26 डिसेंबर 1704 रोजी वयाच्या 9 आणि 6 व्या वर्षी शहीद झाले होते. म्हणून वीर बाल दिवस साजरा केला जातो.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या उपस्थितीत ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी येथे वीर बाल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी इंदरजीतसिंह भाटिया, नगरसेवक सरबजितसिंह भाटिया , सिमरण भाटिया, शीख समाजातील महिला व पुरुष उपस्थित होते.
यावेळी देवरीच्या विविध शाळा महाविद्यालयातील शीख समाजातील विद्यार्थ्यांनी सामुहिकरित्या ब्लॉसम स्कूल येथे हजेरी लावून वीर बाल दिवस निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 व्या शीख गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त मोठी घोषणा केली आहे. आता दरवर्षी 26 डिसेंबरला वीर बाल दिवस साजरा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. याची घोषणा करताना पंतप्रधान म्हणाले, ‘श्री गुरु गोविंद सिंग यांच्या प्रकाश पर्वाच्या शुभ मुहूर्तावर, मला हे सांगताना अभिमान वाटतो की, या वर्षीपासून 26 डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे.
गुरू गोविंद सिंग यांनी धर्मरक्षणासाठी आपल्या कुटुंबाचा त्याग केला. धर्मरक्षणासाठी त्यांचे चार पुत्र शहीद झाले. गुरु गोविंद सिंग यांचे दोन पुत्र 26 डिसेंबर 1704 रोजी वयाच्या 9 आणि 6 व्या वर्षी शहीद झाले होते. पंतप्रधानांनी ट्विट करून लिहिले की, ‘साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी शहीद झाले त्याच दिवशी वीर बाल दिवस साजरा केला जाईल. या दोन्ही महापुरुषांनी धर्माच्या महान तत्त्वांपासून विचलित होण्यापेक्षा मृत्यूला प्राधान्य दिले.
कार्यक्रमाचे संचलन प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांनी केले असून आभारप्रदर्शन विद्यार्थी प्रतिनिधी संस्कृति लांजेवार हिने मानले.