विद्यार्थ्यांनी व्यसनापासून व मोबाईल पासून दूर राहावे-संकेत देवळेकर
देवरी◼️ मोबाईल हा मानवी जीवनात महत्वाचे साधन ठरले असले तरी मोबाईलचा गैरवापर व अतिवापर हा धोकदायकच आहे. तसेच व्यसनामुळे कुणा एका व्यक्तीचे नव्हे तर कुटूंब व समाजाचे मोठे नुकसान होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईल व व्यसनापासून दूर राहावे, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांनी केले.
ते स्थानिक छत्रपती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात पोलिस विभागाद्वारे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम. जी. भुरे होते. प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर मंचावर उपस्थित होते. माता सरस्वती माता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले. दरम्यान देवळेकर यांनी विविध स्पर्धा परीक्षा, त्यांची तयारी याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांसोबत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून हितगूज करुन त्यांच्या शंकाचे समाधान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. एम.जी. भुरे यांनी मांडले. संचालन एस. जी. काशिवार यांनी केले. आभार श्री. एस. टी. मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमात इयत्ता आठवी ते बारावीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी सहकार्य केले.