ब्लॉसम स्कुलची शिरपूर धरणाच्या जलशुद्धीकरण केंद्राला भेट

देवरी 26 :विविध सहशालेय उपक्रम राबवून विद्यार्थी गुणवत्ता केंद्रित अभ्यासक्रम राबविणारी तालुक्यातील लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी प्राचार्य डॉ सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनाखाली देवरी येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या पाणी पुरवठा करणाऱ्या शिरपूर धरणातील जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली.या शैक्षणिक उपक्रमामध्ये नितेश लाडे, वैशाली मोहुर्ले , नामदेव अंबादे , सरिता थोटे हे शिक्षक सहभागी झालेले होते.
धरणातील पाणी कशा प्रकारे शुद्ध केले जाते आणि ते पिण्यायोग्य होते याची सविस्तर माहिती यावेळी देवरी नगरपंचायतीचे पाणीपुरवठा अभियंता सचिन मेश्राम यांनी दिली. विद्यार्थ्यांनी आपल्या अभासक्रमातील धडे प्रत्येक्षात जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन आत्मसात केले. विद्यार्थ्यांनी आपापले प्रश्न यावेळी विचारून प्रत्येक्षात जलशुद्धीकरण पद्धती चे निरीक्षण केले. पुस्तकातील ज्ञान प्रत्येक्षात अनुभवल्याची प्रचिती यावेळी विद्यार्थ्यांनी अनुभवली. सदर जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता 3.5 द.लक्ष.घ.मी. असून या द्वारे संपूर्ण देवरीला शुद्ध पिण्याचे पाणी पुरविले जाते.
पाणी हे जीवन आहे आणि त्याचा वापर काटकसरीने करावा, पाण्याचे जतन करावे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. या क्षेत्र भेटी मध्ये 9 वी ते 10 वी चे विद्यार्थी सहभागी झाले होते.

Print Friendly, PDF & Email
Share