ओवारा ग्रा.पं. रणसंग्रामात मोठा बदल, पुतण्याच्या संपूर्ण पॅनलचे काँग्रेस प्रवेश

देवरी १६ः तालुक्यातील प्रतिष्ठेची मानली जाणारी ओवारा ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणुकीत नवे वळण आले असून सरपंच पदाच्या नवा चेहरा असलेल्या उमेदवाराची संपूर्ण पॅनल निवडणुकीच्या २ दिवसाआधी कांग्रेस पक्षात पक्षांतर केल्यामुळे ओवारा येथे मतदारामध्ये नाराजीचा सुर बघावयास मिळाला आहे. या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी दोन उमेदवार असल्यामुळे थेट लढत पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे कमल येरणे यांची राजकारणाची सुरूवात भाजप पासून झाली १५ वर्षे त्यांनी ओवारा ग्रामपंचायतीवर भाजप चा गड राखला आहे. त्यांच्या विरोधात त्यांचा पुतण्या भाऊराव येरणे आपली वेगळी पॅनल उभी करुन भाजप पक्ष समर्थित निवडणुक लढवित असल्याचे माध्यमांना सांगतीले होते. परंतु आज भाऊराव येरणे यांची संपूर्ण पॅनल आमदार सहसराम कोरोटे यांच्या उपस्थित काँग्रेस पक्षात प्रवेश करीत ग्राम पंचायत ओवारा च्या राजकरणात नवीन वळण आले आहे.

या ग्रामपंचायतीमधे भाजपचे २ गट पडलेले होती परंतु पक्षांतर केल्यामुळे भापज समर्थित दुसऱ्यागटाचे तापमान वाढलेले दिसत असून याचा परिणाम निवडणुकीवर पडणार हे निश्चित असे चर्चा ग्रामपंचायत ओवारा येथील सक्रिय राजकारणी करीत आहे.

दोन्ही उमेदवार एकाच कुटुंबातले आहेत. तालुक्यातील ओवारा
ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून
मतदारांना सरपंचासह एकूण ७ उमेदवारांना निवडणूक द्यायचे आहे. निवडणूक प्रचाराला काही दिवसाचा कालावधी उरलेला आहे आणि पक्षांतरामुळे मतदार राजा संभ्रमात असून १८ डिसेंबर ला उमेदवारांचे भाग्य मतदान पेटीत बंद होणार आहे.

ओवारा ग्रामपंचायतीवर कुणाचा झेंडा फडकणार हे २० डिसेंबर ला स्पष्ट होणार असून मतदार राजा किंग मेकर ठरणार आहे.

Share