देवरी येथील बौध्द विहारात महापरिनिर्वाण दिन साजरा

देवरी: देवरी येथील मुलगंध कुटी बौध्द विहार येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन बुधवार (ता.६ डिसेंबर ) रोजी या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुध्द यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जि.प.सदस्य तथा तालुका कांग्रेस चे अध्यक्ष संदिप भाटिया, देवरी शहर कांग्रेस अध्यक्ष कुलदिप गुप्ता, नगरसेवक सरबजीतसिंग भाटिया, मोहन डोंगरे, नितीन मेश्राम, कांग्रेसचे तालुका महासचिव बळीराम कोटवार, अनुसूचित जाती सेल चे तालुकाध्यक्ष अमित तरजुले, सी.बी. कोटांगले, बालु झिंगरे,अंतरिक्ष बहेकार यांच्या सह देवरी शहरातील लोक बहुसंख्येने उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share