अतिसंवेदशील नक्षलग्रस्त आदिवासी बहुल युवक – युवतींना पोलीस भरती, स्पर्धा परिक्षा, रोजगार, शिक्षण, खेळ या विषयावर मार्गदर्शन
◼️उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी श्री संकेत देवळेकर यांचे स्तुत्य उपक्रम
देवरी ०७ः पोलीस स्टेशन केशोरी अंतर्गत स. दु. क्षेत्र भरनोली कार्य क्षेत्रातील ग्रामिण व आदिवासी बहुल अती- संवेदनशिल भरनोली गावातील दिपस्तंभ वाचनालयात उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी श्री संकेत देवळेकर यांनी भेट देऊन उपस्थीत युवक- युवतींना आगामी पोलीस भरती व ईतर स्पर्धा परिक्षा, रोजगार, शिक्षण, खेळ या विषयावर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे त्यांना मैदानी तसेच लेखी परिक्षेबाबत सविस्तर माहिती दिली, अतिसंवेदशील नक्षलग्रस्त आदिवासी बहुल, ग्रामिण भागातील युवक – युवतींनी जास्तीत जास्त प्रमाणात पोलीस भरती मध्ये सहभाग घेऊन पोलीस दलात भरती व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. त्याच प्रमाणे या भागातील मुलांना वेळोवेळी मार्गदर्शन करणार असल्याचे आश्वाशन देण्यात आले. या भेटीमुळे स्पर्धा परिक्षेची तयारी करित असलेल्या युवक – युवतींना योग्य मार्गदर्शन लाभले. त्यामुळे उपस्थित युवक-युवतींनी त्यांना विविध परिक्षेची सुद्धा माहिती मिळाल्याचे सांगीतले. सदर दीपस्तंभ वाचनालयात, आदिवासी दुर्गम, अती संवेदनशील, नक्षलग्रस्त भागातील ग्राम- भरनोली, राजोली, खडकी, बोरटोला, नागणडोह, जांभळी, सायगाव या आदिवासी बहुल गावातील युवक-युवती मोठया प्रमाणात अभ्यास करतात. या मार्गदर्शन कार्यक्रमावेळी स.दु.क्षेत्र भरनोलीचे प्रभारी अधिकारी श्री टार्फे व पोलीस अंमलदार, तसेच परिसरातील नियमित प्रशिक्षण घेणारे २५ युवक- युवती उपस्थित होते.
पोलिस अधीक्षक, गोंदिया श्री निखिल पिंगळे सर, अप्पर पोलिस अधीक्षक, गोंदिया कॅम्प देवरी श्री. अशोक बनकर सर यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी श्री.संकेत देवळेकर व सदर उपक्रमात सहभागी सर्व पोलिस अधिकारी, पोलिस अंमलदार यांचे त्यांनी केलेल्या या स्तुत्य उपक्रमा बद्दल अभिनंदन केले आहे.